योगींच्या ‘मोदीजी की सेना’ला व्ही. के. सिंह यांची चपराक

VK-singh
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या एका प्रचार सभे दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कराचा उल्लेख ‘मोदीजी की सेना’ असा केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली. योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस देखील पाठवली.

पण, आता योगी यांच्या या वक्तव्याला घरचा आहेर मिळाला आहे. माजी लष्करप्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी ‘मोदीजी की सेना’ असा उल्लेख करणारे ‘देशद्रोही’ असल्याची टीका केली आहे. व्हि. के. सिंह यांचे हे विधान म्हणजे पक्षाला घरचा आहेर आहे. मोदी की सेना असा उल्लेख देशाच्या सैन्याला म्हणने चुकीचे असून ती देशाशी गद्दारी असल्याचे व्हि. के. सिंह यांनी म्हटल्याचे वृत्त बीसीसीने दिले आहे. लष्कर हे देशाचे असते कोणा एका नेत्याचे नसते, असे देखील व्हि. के. सिंह यांनी स्पष्ट म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नोटीस पाठवली आहे. भारतीय सेनेचा योगी आदित्यनाथ यांनी उल्लेख ‘मोदी की सेना’ असा केला होता. निवडणूक आयोगाने या वक्तव्याची दखल घेत ही नोटीस पाठवली आहे. आचारसंहितेच्या अंतर्गत ही नोटीस देण्यात आलेली नाही. तर निवडणूक आयोगाने याआधीच राजकीय पक्षांना सांगितले होते की, प्रचारादरम्यान भारतीय लष्कराचा वापर करण्यात येऊ नये. योगींना आयोगाने ही नोटीस याच सूचनेचे पालन न केल्याबद्दल पाठवली आहे.

दरम्यान, भडकाऊ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केले. काँग्रेस युपीएच्या काळात दहशतवाद्यांना बिर्याणी देत होते तर मोदींची सेना दहशतवाद्यांना गोळ्या घालते, असे वक्तव्य योगी यांनी केले.

Leave a Comment