निवडणूक लढवण्यास सुमित्र महाजन यांचा नकार

sumitra-mahajan
भोपाळ – २०१४ मध्ये मध्यप्रदेशच्या इंदूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकणाऱ्या भाजप खासदार सुमित्रा महाजन यांनी तिकीट मिळत नसल्याचे पाहून यंदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदार संघात भाजपने अद्याप उमेदवार न दिल्यामुळे येथे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

भाजपमध्ये ताई म्हणून ओळख असलेल्या सुमित्रा महाजन यांचा संयम तुटलेला दिसत असल्यामुळेच शेवटी निर्णय घेऊन निवडणूक न लढवण्याचा त्यांनी निश्चय केलेला दिसतो. तिकीट न मिळाल्याचे दुःख मात्र त्यांच्या पत्रातून साफ छळकत आहे. पक्ष या जागेवरुन उमेदवार देण्यासाठी गोंधळात दिसत आहे. या मतदार संघातून उमेदवार देण्यासाठी पक्षाला संकोच होत असावा, असे वाटते. आपण पक्षावर या जागेवरुन उमेदवारी देण्याची जबाबदारी सोपवली होती. पण आताही पक्ष गोंधळातच दिसत असल्यामुळे यंदा निवडणूकच मी लढवणार नाही. आता पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवार निवडावा, असे महाजन यांनी म्हटले आहे.

चौथ्या टप्प्यात मध्यप्रदेशमध्ये मतदान होणार आहे. या मतदार संघातून तब्बल ८ वेळा सुमित्रा महाजन यांनी निवडणूक जिंकली असल्यामुळे भाजपच्या पारड्यात ही जागा असल्याचे म्हटले जाते. सुमित्रा महाजन यांना यावेळीही भाजप उमेदवारी देणार अशी चर्चा होती. त्यासाठी त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली होती. मात्र, त्यांच्या पत्रामुळे आता त्या निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment