मार्गदर्शक असलेले जीपीएस बंद होण्याच्या मार्गावर

GPS
मुंबई : आज आपल्याला एखादा पत्ता शोधण्यासाठी सर्वात महत्वाची मदत जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम करतो. रेल्वेची माहिती असो किंवा गुगल मॅपचा वापर, जीपीएस आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. जीपीएस नसेल तर आपली काय अवस्था होईल याची कल्पना देखील करता येणार नाही. उद्यापासूनच म्हणजे 6 एप्रिलपासून जीपीएस बंद होऊ शकते. संपूर्ण जगातील टेक्नोलॉजी एक्सपर्ट आणि नेटवर्क ऑपरेटर्स असे होऊ नये यासाठी या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

याबाबत ईएएसए सेफ्टी इन्फॉरमेशनच्या माहितीनुसार जीपीएस रिसीव्हरवर 6 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून नॅव्हिगेशन डेटा चुकीचा येईल. जीपीएसच्या ‘वीक नंबर’ (आठवड्याचा क्रमांक) यासाठी रोलओव्हर इव्हेंटला रिसेट करावे लागते. 6 एप्रिलपर्यंत जीजर पीएस डेटा रिसीव्हरला रिसेट केले गेले नाही, तर नॅव्हिगेशन सोल्यूशसाठी ज्या टाईम डेटाचा वापर केला जातो, तो बदलून जाईल. जीपीएसच्या वेळेत एका नॅनो सेकंदाचा बदलही जीपीएस डेटामध्ये एक फुटाच्या बरोबरीचा होऊ शकतो, असे ईएएसएने सांगितले.

शून्य ते 1023 आठवड्यांची जीपीएसच्या वीकली नंबरची मर्यादा ही आहे. आधीच जी मर्यादा पार झाली आहे. याचा 2014 वा आठवडा 6 एप्रिल 2019 पासून सुरु होणार असल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. जीपीएस सिस्टीमचा पहिला आठवडा 6 एप्रिलपासून सुरु होईल. म्हणजेच जेव्हा जीपीएस मध्ये पहिल्यांदा वेळ आणि काळ टाकण्यात आला असेल, तेव्हापासून पुन्हा ते चक्र सुरु होईल. जीपीएस 6 एप्रिल 2019 ला 21 ऑगस्ट 1999 समजेल आणि त्यानुसार काम करेल. जीपीएस 21 ऑगस्ट 1999 लाच रोलओव्हर करण्यात आले होते. 21 ऑगस्ट 1999 लाही जीपीएसमध्ये ही समस्या उद्भवली होती. तेव्हा जीपीएसचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर होत नव्हता. पण, ही समस्या जर आज उद्भवली तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. कारण, आज उद्योग-धंद्यांमध्ये, सरकार आणि सामान्य लोकही मोठ्या प्रमाणावर जीपीएसचा वापर करतात.

या समस्येवर जगभरातील जानकार आणि टेक्नोलॉजी एक्सपर्ट उपाय शोधत आहेत. ही समस्या खूप मोठी असल्यामुळे संपूर्ण जगातील जीपीएस सिस्टमवर याचा परिणाम होईल. कारण, आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन आहेत. ज्यावर आपण रस्ता शोधण्यासाठी, आपले लोकेशन शेअर करण्यासाठी, टॅक्सी बुक करण्यासाठी इत्यादी कामांसाठी जीपीएसचा वापर करतो. तसेच जीपीएस मुळे गुन्हेगारीवर रोख लावण्यातही बरीच मदत होते. त्यासोबतच वेगवेळ्या उद्योगांतही जीपीएस चा वापर केला जातो. त्यामुळे जर जीपीएस सेवा ठप्प झाली किंवा त्यात काही बिघाड आला तर जगभरातील लोकांना याचा त्रास होणार आहे.

Leave a Comment