२०१९ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यावर ‘चौकीदार’ तुरुंगात जाईल

rahul-gandhi
नागपूर : नागपूरचे उमेदवार नाना पटोले आणि रामटेकचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी आयोजित नागपुरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवरील सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष यांनी राफेलमधील चोरी छोटी नाही तर मोठी आहे. २०१९ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यावर ‘चौकीदार’ तुरुंगात जाईल, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींवर केला.

पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा, काही निवडक उद्योजकांचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यावरून सडकून टीका केली. पुढे ते म्हणाले, जनतेला मोदी मित्रो असे संबोधतात आणि अनिल अंबानींना अनिल भाई, मेहुल चौक्सीला मेहुल भाई, नीरव मोदीला नीरव भाई आणि विजय माल्ल्याला विजय भाई म्हणतात. माल्ल्या देशाबाहेर पळून जाण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतो. फ्रान्सच्या राष्ट्रपतींना भेटून राफेलचे दर पंतप्रधान मोदी वाढवतात आणि अनिल अंबानी यांना त्याचे कंत्राट देण्यास सांगतात. मोदी पूर्वी ‘मी देशाचा चौकीदार’ असल्याचे सांगायचे आता आपण सर्व चौकीदार असल्याचे सांगत फिरत आहेत. चौकीदार शेतकरी, मजुरांना घरासोर असतो काय, असा सवाल राहुल यांनी केला.

अनिल अंबानी यांची काही चौकीदार चौकीदारी करीत आहेत. हे चौकीदार लोकसभा निवडणुकीनंतर तुरुगांत जातील. कारण, राफेल विमान खेरदीच्या वाटाघाटी मोदींनी केली. त्यांच्यावर कारवाई होणार, त्यांना सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment