पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अभिनेता सलमान खान अडकण्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशमध्ये ‘दबंग 3’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शिवलिंग लाकडी वेष्टनाने झाकल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सलमानवर भाजपने हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी हल्लाबोल केला आहे.
‘दबंग 3’च्या शूटिंगवेळी सलमानने दुखावल्या हिंदुच्या भावना
सलमानच्या ‘दबंग 3’ चित्रपटाचे मध्य प्रदेशातील महेश्वर या धार्मिक स्थळावर शूटिंग सुरु आहे. चित्रपटाचा सेट नर्मदा नदीच्या तीरावर बांधण्यात आला आहे. सलमानने शिवलिंगाचे संरक्षण करणे आणि त्याचे पावित्र्य राखणे, या हेतूने लाकडी वेष्टनाने झाकल्याचा दावा केला आहे.
सोशल मीडियावर झाकलेल्या शिवलिंगाचे फोटो वायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील भाजपमध्ये वाक्-युद्ध रंगले. हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या घटना कमलनाथ सरकारमध्ये वारंवार घडत असल्याचा आरोप भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी केला.
Namaste, Salaam Alaikum, Hello and a big thank you to all my fans & the police of #madhyapradesh #maheshwar #dabangg3 @PDdancing @arbaazSkhan @Nikhil_Dwivedi pic.twitter.com/ubN1X33jI8
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 3, 2019
भाजपने भगवान शंकराविषयी अनादर व्यक्त केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने मात्र भाजपच्या संकुचित मानसिकतेवर बोट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच दबंग 3 च्या शूटिंगला सलमानने सुरुवात केली. तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने कालपासून चित्रीकरण सुरु केले आहे.