या अभिनेत्री घेऊ शकतात दयाबेनची जागा

dayaben
(छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रसिद्ध पात्र असलेली दया बेन मालिकेत परत येणार की नाही? या प्रश्नामुळे तिचे चाहते सध्या चिंतेत आहेत. दया भाभी म्हणजेच दिशा वाकाणी एका वर्षांपासून जास्त काळ शोमधून बाहेर आहे. मालिकेत दीशा कमबॅक करणार असे वृत्त काही दिवसांपुर्वी आले होते. पण मालिकेचे निर्माते असीत मोदीने दिलेल्या माहितीनुसार नवीन दयाबेनच्या शोधात असल्याचे त्यांनी म्हटल्यामुळे या मालिकेला दीशा वाकानीने अखेर अलविदा केले आहे. दीशा मालिकेत झळकणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. तुर्तास या भूमिकेसाठी नवीन नाव समोर येत आहे.

त्यात आघाडीवर असलेली अभिनेत्री आणि बिग बॉसच्या पर्वाची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदेचे नाव समोर येत आहे. दुस-या स्थानावर कॉमेडीयन सुगंधा मिश्रा, रागीनी खन्ना, स्मिता बन्सल आणि सिमोना चक्रवर्ती यांची दया बेन या भूमिकेसाठी वर्णी लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. निर्मात्यांनी दिशाची फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता पाहता वर्षभराहून अधिक काळ वाट पाहिली. पण मालिकेच्या कथानकाची यापुढची गरज पाहता दिशासाठी आणखी थांबणे योग्य नसल्याचे निर्मात्यांनी म्हटल्यामुळे वरील अभिनेत्रींपैकी कोणाची वर्णी लागते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

‘तारक मेहता का उलटा चश्मा’मध्ये दिशा 2008 पासून सतत काम करत आहे. सप्टेंबर 2017 मध्ये तिने मेटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती शोमध्ये येईल असे बोलले जात होते. मुलीच्या देखरेखीत व्यस्त असल्यामुळे दीशाने मालिकेत ब्रेक घेतला होता.

ती मालिकेत दिशाचा पती मयूरच्या हस्तक्षेपामुळे कमबॅक करु शकत नसल्याच्याही चर्चा होत्या. दिशाने काम करू नये असे सीए असलेल्या मयूरला वाटत असल्याचे सांगितले जात होते. दिशाने काय करावे, तिच्या मनात काय सुरू आहे, घरात काय चालले आहे आम्हाला माहित नसल्याचेही निर्मात्यांनी सांगितले होते.

Leave a Comment