कालच अनूप जलोटा यांची कथित गर्लफ्रेंड आणि टेलिव्हिजन विश्वातील सर्वात विवादित शो ‘बिग बॉस’ची स्पर्धक जसलीन मथारू हिने आपला वाढदिवस साजरा केला. जसलीन संपूर्ण ‘बिग बॉस १२’ शोदरम्यान चांगलीच चर्चेत होती. अनूप जलोटा आणि जसलीनच्या अफेअरची मागील सीजनमध्ये खूप चर्चा झाली. सर्वच प्रेक्षकांना अनूप जलोटा आणि जसलीनच्या नात्यामुळे मोठा धक्का बसला होता. नुकताच आपला २८ वा वाढदिवस जसलीनने साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीतील काही फोटो जसलीनने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जसलीन तिच्या या फोटोजमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
पुन्हा एकदा चर्चेत आली अनूप जलोटांची गर्लफ्रेंड
४ एप्रिल १९९० साली पंजाबी परिवारातून आलेल्या जसलीनचा जन्म मुंबईत झाला. संगीताची लहानपणापासून आवड असणाऱ्या जसलीनने संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. जसलीनने वयाच्या १६ वर्षी कॉलेजमध्ये बेस्ट फिमेल सिंगरचा पुरस्कार पटकावला होता. अनेक नामवंत कलाकारांसोबत जसलीनने काम केले आहे. मीका सिंह, सुखविंदर सिंह, अमजद खान यांसारख्या गायकांसोबत तिने स्टेज शेअर केला आहे.
जसलीन ‘बिग बॉस १२’ मधून सर्वात चर्चेत आली. जसलीनचे नाव या शोमध्ये भजन सम्राट अनूप जलोटा यांच्यासोबत जोडण्यात आले होते. ‘बिग बॉस १२’मध्ये जसलीन अनूप जलोटा यांची गर्लफ्रेंड बनून शोमध्ये दाखल झाली होती. या शोसह संपूर्ण देशातच अनूप जलोटा आणि जसलीनची जोडी चर्चेचा विषय बनला होता. ३७ वर्षांचे अनूप जलोटा आणि जसलीन यांच्यातील अंतरच खरा चर्चेचा विषय झाला होता. परंतु त्यानंतर काही दिवसांतच या दोघांच्या नात्याबाबत खुलासा करण्यात आला.
शोबाहेर जसलीन आल्यानंतर अनूप जलोटा आणि माझे रिलेशनशिप हे एक प्रॅन्क असल्याचे तिने म्हटले. आम्हा दोघांनाही या प्रॅक्नने खूप प्रसिद्ध केले. परंतु नंतर हा प्रॅन्क फेल झाला. शोची थिम एक जोडी असल्याने मीच अनूप जलोटा यांना माझ्यासोबत शोमध्ये सामील होण्यास सांगितले होते. मात्र आमची गुरू-शिष्याची जोडी होती. परंतु मीच अनूप आणि मी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. मात्र नंतर हाच प्रॅन्क माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर भारी पडला असल्याचे तिने सांगितले. गायिका तसेच अभिनेत्रीही आहे. जसलीनचे वडिल केसर मथारू दिग्दर्शक आहेत. जसलीनने द डर्टी रिलेशन (२०१३) आणि द डर्टी बॉस (२०१६) या चित्रपटात काम केले आहे. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन केसर मथारू यांनी केले आहे.