लेनोवोचा खास डिझाईनचा फोल्डेबल स्मार्टफोन येणार

lenovo
स्मार्टफोन जगतात सध्या बहुतेक सर्व कंपन्या फोल्डेबल फोनवर फोकस करत आहेत. त्यात आता लेनोवोची भर पडली आहे. त्यांनी मोटोरोला आरएझेडआर पेटंटशी मिळताजुळता फोन सादर करण्याची तयारी चालविली असून हा फोन वेगळ्याच डिझाईनमुळे चर्चेत आला आहे.

या फोनचा फोल्डेबल स्क्रीन पुढच्या बाजूला पूर्णपणे फोल्ड होतो. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट नुसार या फोनला फ्लेग्झीबल हिंजेस आहेत. फोन वेगळ्या प्रकारे फोल्ड होण्याची सुविधा युजरला यामुळे मिळणार आहे. सेकंड स्क्रीन फोनच्या रिअर मध्ये एकदम खालच्या भागात असून हा स्क्रीन फोल्ड होतो. फोल्ड झाल्यावर तो मुख्य फ्लेग्झीबल स्क्रीनच्या छोट्या भागाला कव्हर करतो आणि फोन सहज खिशात ठेवता येतो. फोल्ड केल्यावर स्क्रीनचा मोठा भाग प्रोटेक्ट होतो. यात फ्रंट कॅमेरा इअरपीस सह टॉप बेझल मध्ये आहे. तर प्रायमरी कॅमेरा फोनच्या बॅक पॅनलवर आहे. फोनचा खालचा भाग वरच्यापेक्षा छोटा असून त्याचा लोअर परत दुमडता येतो.

सॅमसंगने त्यांचा गॅलेक्सी फोल्ड नुकताच लाँच केला आहे तर हुवाई ने नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड मोबाईल कॉंग्रेस मध्ये त्यांचा मेट एक्स सादर केला आहे. या शिवाय शाओमी, ओप्पो, टीसीएल या कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल फोन लवकरच येत असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment