वेटरच्या दक्षतेमुळे भारत इस्रायल शस्त्रखरेदी कागदपत्रे सहीसलामत

isreal
इस्रायल आणि भारत याच्यात होऊ घातलेल्या शस्त्र सौदा कराराची गुप्त आणि अतिशय महत्वाची कागदपत्रे एका वेटरच्या दक्षतेमुळे चुकीच्या माणसांच्या हातात न पडता सुरक्षित राहिल्याची घटना घडली आहे. वेटरच्या प्रसंगावधानामुळे ही कागदपत्रे लिक न होता सुरक्षित पणे भारतातील इस्त्रायली दुतावासात पोहोचाविली गेल्याचे समते.

इस्रायली वेबसाईट हारेत्झने केलेल्या दाव्यानुसार आणि इस्त्रायल मिडियाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षीच्या जानेवारीत इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मीर बेन शब्बत सुरक्षा आणि शस्त्र सौदा संदर्भात भारतात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या डेलिगेशन मधील एका व्यक्तीकडून ही महत्वाची आणि संवेदनशील कागदपत्रे नजरचुकीने त्यांनी इस्रायलला परतण्याअगोदर विमानतळाजवळ असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये डिनर घेतले तेव्हा विसरली. इस्त्रायल ला परतण्याअगोदर या टीमने भारताचे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेऊन त्यासंदर्भात चर्चा केली होती.

या चर्चेत विविध प्रकारची शस्त्र खरेदी, ,हेरगिरी करणारी विमाने, रणगाडाविरोधी मिसाईल, ड्रोन, रडार अश्या मुद्द्यांचा समावेश होता. शब्बत यांच्या एका साथीदाराकडे ही महत्वाची कागदपत्रे होती आणि हे पार्सल इस्त्रायलला परतण्यापूर्वी या डेलिगेशनने डिनर घेतले त्या रेस्टॉरंटमध्ये विसरले. पण तेथील एका वेटरच्या लक्षात ही बाब आल्यावर त्याने प्रसंगावधान राखून त्याच्या इस्रायलमधील मित्राशी संपर्क साधला. या मित्राची आई इस्रायलच्या भारतीय दुतावासात काम करत असे. वेटरने मित्राशी संपर्क केल्यावर तो तातडीने भारतात आला आणि त्यांनी ही कागदपत्रे प्रथम त्याच्या आईकडे दिली आणि नंतर ती इस्रायल दुतावासातील सुरक्षा अधिकाऱ्यांना सोपविली गेली.

Leave a Comment