लाडक्या लेकीसाठी बापाने खरेदी केला कोट्यावधीचा हिरा

manmi
मुलगी आणि वडील यांच्यातील नाते काही वेगळेच असते. लेक बापाची अधिक लाडकी असते आणि त्यातून बाप कोट्याधीश असेल तर लेकीसाठी कोणतीही वस्तू सहजी खरेदी करू शकतो याचा अनुभव मंगळावरी हॉंगकॉंग येथे झालेल्या मौल्यवान हिरे लिलावात आला. हॉंगकाँग ज्युवेल्स आणि जेड्स लिलावात जगभरातील मौल्यवान हिरे विक्रीसाठी आले होते. त्यात एका जपानी हिरे संग्रहाकाने तब्बल ८८.२२ कॅरेटचा अतिशय उत्तम पैलू पडलेला हिरा ९६ कोटी रुपये म्हणजे १३.७७ दशलक्ष डॉलर्सना खरेदी केला आणि त्याला मानामी स्टार असे त्याचा कन्येचे नाव देऊन टाकले.

diamond
ओव्हल शेपचा हा हिरा अतिशय आकर्षक आणि जगातील सर्वोत्कृष्ट पैलू पाडल्या गेलेल्या हिरयातील एक आहे. पांढऱ्याशुभ्र रंगाचा हा हिरा शुद्धतेच्या सर्व कसोट्या पूर्ण करणारा आहे. बोट्स्वाना हिरे खाणीत सापडलेल्या २४२ कॅरेटच्या कच्च्या दगडातून हा हिरा मिळविला गेला आहे. याचा आकार अतिशय देखणा आहे. या लिलावात ५० कॅरेटपेक्षा अधिक वजनाचे ओव्हल शेपचे जे हिरे होत त्यात हा सर्वात मोठा आणि अतिशय शुद्ध आहे असे समजते. अन्य विक्री झालेल्या टॉप तीन हिऱ्यात १३.८८ कॅरेटचा सफायर २.४७ दशलक्ष डॉलरला तर १०.८८ कॅरेटचा हिरा १.७८ दशलक्ष डॉलरना विकला गेला.

विशेष म्हणजे चीन मध्ये लकी मानल्या जाणार्या ८ नंबरशी या सर्व हिर्यांचे कनेक्शन होते. ८८ डायमंड्स सिरीज खाली हा लिलाव केला गेला. आणि तो लिलाव करणारया सोथबी ऑक्शन कंपनीला चांगलाच लाभाचा ठरला.

Leave a Comment