दोन वर्षाच्या चिमुरडीच्या पेंटिंग्जना लाखोची किंमत

paintings
अमेरीकेतील अवघ्या दोन वर्षाची एक चिमुरडी सध्या भलतीच चर्चेत आहे. नुकत्या बोलायला किंवा चालायला शिकायच्या वयात ही मुलगी कमालीची पेंटिंग्ज बनविते आहे आणि तिच्या या चित्राना लाखो रुपये मोजणारे रसिक प्रेमी भेटत आहेत. या मुलीच्या पेंटिंग्जचे इन्स्टाग्राम अकौंट आहे आणि तिची पेंटिंगची अद्भुत दुनिया आपण तेथे पाहू शकतो. लोलो जून असे या जीनियस कन्येचे नाव आहे. न्यूयॉर्कच्या आर्ट वर्ल्ड गॅलरी मध्ये तिची पेंटिंग विक्रीसाठी लावली गेली आहेत. अर्थात लोलोच्या या कौशल्याचा तिच्या आई बाबांना खूपच अभिमान वाटतो.

june
लोलोला अजून डायपर घालावा लागतो पण रंगाचे तिचे ज्ञान भल्याभल्या रंगकर्मीना मागे सारेल असे आहे. आत्तापर्यंत लोलोची १२ पेंटिंग २०० ते २३००० डॉलर्स अश्या किमतींना विकली गेली आहेत.

lola
न्यूयॉर्क मधील एक प्रसिद्ध डॉक्टर डेव्हिड कॉलबर्ट सांगतात, ते चाशामा आर्ट गॅलरी समोरून जात असताना एका पेंटिंगवर त्याची नजर खिळली आणि ते खरेदी केल्याशिवाय त्यांचे पाउल पुढे पडेना. शेवटी त्यांनी ६०० आणि २०० डॉलर्सना दोन पेंटिंग खरेदी केली. ही पेंटिंग लोलोची होती.

Leave a Comment