मुले आणि पार्टनरच्या पैशांवर होत आहे माझा उदरनिर्वाह – माल्ल्या

vijay-mallya
नवी दिल्ली : कधी एकेकाळी ऐश्वर्या उपभोगणाऱ्या उद्योगपती विजय माल्ल्यावर उधार की जिंदगी जगण्याची वेळ आली आहे. सध्याच्या घडीला माल्ल्याचा पत्नी, मुले आणि मित्रांकडून मिळालेल्या पैशांवर उदरनिर्वाह होत आहे. ब्रिटनच्या न्यायालयात त्याने बुधवारी आपले दु:ख मांडले. 1.35 कोटी रुपये त्याचा पार्टनर आणि पत्नीचे वार्षिक उत्पन्न आहे. तर विजय माल्ल्याकडे 2 हजार 956 कोटींची संपत्ती आहे. त्याने या संपत्तीच्या सेटलमेंटसाठी कर्नाटक उच्च न्यायालयाला ऑफर देखील दिली आहे.

विजय माल्ल्या विरोधात 11 सप्टेंबर 2018 ला 13 भारतीय बँकाकडून याचिका दाखल झाल्या. सध्या त्यावर सुनावणी सुरु आहे. माझा संभाळ मुले आणि पार्टनर ललवानी करत असल्याचे माल्ल्याने ब्रिटनच्या न्यायालयात सांगितले. स्वत:चा गुजराणा करण्यासाठी माल्ल्याने व्यावसायिक बेदीकडून 75.7 लाख आणि आपली खासगी सहाय्यक महलकडून 1.15 कोटी रुपये उधार घेतले आहेत. त्याने हे कर्ज कर्ज चुकवणे आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी घेतले आहे.

माल्ल्याच्या 13 बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निजेल तोजीकडून माल्ल्याने 11 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. एचएमआरसीकडून 2.40 कोटी रुपये आणि त्याचा माजी वकिल मैकफारलेंसकडूनही एक मोठी रक्कम घेतली आहे. भारतीय बँकाकडून घेतलेल्या 3.37 कोटी रुपयांपैकी कायदेशीर 1.57 कोटीची रक्कम देखील त्याने दिली नाही. त्याचबरोबर माल्ल्याने ब्रिटीश सरकारचा साधारण 2.40 कोटी रुपयांचा कर देखील थकवला आहे.

Leave a Comment