नव्या लुकसह ‘रज्जो इज बॅक…..’

sonakshi-sinha
सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या दबंग या चित्रपटातून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती ‘रज्जो’च्या भूमिकेत झळकली होती. चित्रपटातील तिचाच ‘थप्पड से डर नही लगता साहाब…. प्यार से लगता है…’, हा संवाद त्यावेळी खुप गाजला होता. प्रेक्षकांच्या मनावर ‘रज्जो’च्या याच अंदाजाने राज्य केले आणि पाहता पाहता सोनाक्षीही ‘दबंग’चा चेहरा झाली. याच चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणास सध्या सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती देत या चित्रपटातील तिचा लूक सोनाक्षीनेच सर्वांच्याच भेटीला आणला आहे.

तिने ‘रज्जो इज बॅक…..’, असे कॅप्शन लिहित चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाल्याचे चाहीर केले. सोनाक्षीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती गुलाबी आणि सफेद रंगांची रंगसंगती असणाऱ्या एका सुरेख साडीमध्ये पाठमोरी उभी असल्याचे दिसत आहे. मोकळे केस आणि एका बाजूला माळलेली सुंदर फुले तिचा हा लूक परिपूर्ण करत आहेत. त्यामुळे ही ‘रज्जो’ चित्रपटापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकत असल्याचे म्हटले तर वावगे ठरु नये.


अभिनेता सलमान खान यानेही काही दिवसांपूर्वी ‘दबंग ३’च्या चित्रीकरणास सुरुवात झाल्याची माहिती दिली होती. त्याच्या या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण, सोनाक्षीच्या या एका फोटोने दबंग खानलाही मात दिली आहे. येत्या काळात सोनाक्षी ‘कलंक’ या मल्टीस्टारर चित्रपटातून झळकणार आहे. त्यामुळे ती ‘कलंक’ची प्रसिद्धी आणि ‘दबंग ३’चे चित्रीकरण अशा विविध गोष्टींमध्ये मेळ साधत आहे.

आपल्या खांद्यांवर ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभुदेवाने घेतली असून, या चित्रपटातून अभिनेता अरबाज कान हा सुद्धा झळकणार आहे. अरबाज या निमित्ताने पुन्हा एकदा ‘मख्खी’ची भूमिका साकारणार आहे. त्याने ज्यासाठी मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण सुरूही केल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Comment