रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात ०.२५ टक्के कपात

RBI
नवी दिल्ली – भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. ६.२५ टक्क्यावरुन रेपो रेट ६ टक्के केल्यामुळे कर्ज घेतलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेपो दरात कपात रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निश्चिती समितीकडून अपेक्षित होती. रेपो दरात त्यानुसार आणखी पाव टक्का कपातीचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या द्विमासिक आढावा बैठकीत रेपो दराला पाव टक्का कात्री लावली गेली. ही कपात तब्बल १८ महिन्यांच्या अंतरानंतर नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या बैठकीतच केली गेल्यानंतर रेपो दर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्के झाला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या दृष्टीने चलनवाढीचा दर समाधानकारक स्तरावर असून, तो आगामी सहा महिन्यांतही लक्ष्यित ४ टक्के पातळीच्या आतच राहण्याचे खुद्द मध्यवर्ती बँकेचेच संकेत आहेत. त्याच वेळी अर्थव्यवस्था उभारी दर्शवीत असली तरी खासगी क्षेत्रातून गुंतवणूक वाढेल अशी चालना आवश्यक आहे.

Leave a Comment