या उत्पादनाची जाहिरात करणार नाही रणवीर सिंह

ranveer-singh
अभिनेता रणवीर सिंहने कंडोमची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असून रणवीरने हा निर्णय विवाहबंधनात अडकल्यामुळे घेतल्याचे म्हटले जात आहे.

आपल्या समाजात कंडोम, सेक्स एज्युकेशन यासारखे विषय निषिद्ध मानले जातात. पाच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध कंडोम ब्रँडसोबत रणवीर सिंहसारख्या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याने टाय-अप केले होते. रणवीर सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत जनजागृती करण्यासाठी ड्यूरेक्सचा ब्रँड अॅम्बेसेडर झाला, पण आता रणवीरसोबतचा हा करार मोडित निघाला आहे.

‘ड्युरेक्स’ने रणवीरसोबतचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. रणवीरसोबतचा हा करार रद्द विवाहबंधनात अडकल्यामुळे झाल्याचे म्हटले जात आहे. पण रणवीरने मानधन वाढवून मागितल्यामुळे बोलणी फिस्कटल्याच्या चर्चा काही ठिकाणी होत आहेत. गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला रणवीर-दीपिका लग्नाच्या बेडीत अडकले. ‘ड्युरेक्स’च्या ट्विटर हँडलवरुन त्यावेळी दोघांना हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या.

Leave a Comment