सत्तेत आल्यास बदलुन देणार जुन्या नोटा – प्रकाश आंबेडकर

prakash-amabedkar
नांदेड – आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी खुप काही आश्वासने देत आहेत. त्यातच आपली आघाडी सत्तेत आली तर जुन्या नोटा बदलुन देऊ असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील प्रचारसभेत दिले आहे. भाजप सरकार व्यापाऱ्यांना धमकावून प्रचार करण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला आहे.

व्यापाऱ्यांचे कंबरडे नोटांबदीमुळे मोडले असून अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अद्यापही चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा काही व्यापाऱ्यांकडे असल्याची माहिती मला मिळाली आहे. आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही तुमच्या या जुन्या नोटा बदलून देऊ, असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी हे आश्वासन हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदावारासाठी आयोजित प्रचारसभेत बोलताना दिले.

Leave a Comment