मोदींच्या बायोपिकचे प्रदर्शन लांबणीवर

PM-Modi
निर्माते संदीप सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आल्याचे स्पष्ट केल्यामुळे हा चित्रपट ५ एप्रिल या नियोजित तारखेला प्रदर्शित होणार नाही. पण त्यांनी चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे देखील सांगितलेले नाही. ती तारीख लवकरच कळवण्यात येईल असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


सेन्सॉर बोर्डाकडून अद्याप या चित्रपटाला मंजुरी मिळाली नसल्याने हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत असल्याचे कारण निर्मात्यांच्या वकिलांनी सांगितले. दरम्यान, सध्या बऱ्याच चर्चा या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत सुरु आहेत. विरोधकांच्या मते हा मोदींच्या वैयक्तिक प्रचारासाठी बनवण्यात आलेला चित्रपट असल्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक उमंग कुमार देखील निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत.

Leave a Comment