मायावती एका तिकीटाचे घेतात तब्बल 15 कोटी – मनेका गांधी

maneka-gandhi
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिलला होणार असल्यामुळे ज्याठिकाणी हे मतदान होणार त्या मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला आहेच, त्याचबरोबर राजकीय पक्षांची एकमेंकावर जोरदार चिखलफेक देखील केली जात आहे. याच दरम्यान बसप सुप्रिमो मायावती यांच्यावर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी निशाणा साधला आहे. पैसे घेऊन मायावती उमेदवारी देतात, हे जग जाहिर आहे. त्या एका तिकीटासाठी १५ कोटी रुपये घेतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सुलतानपूर मतदारसंघातून मनेका गांधी या निवडणूक लढवत आहेत.

मनेका गांधी पुढे म्हणाल्या, मायावती तिकीटांचा बाजार करतात हे जगजाहिर आहे. ही गोष्ट त्यांच्या पक्षाचे लोक अभिमानाने सांगतात. उमेदवारी एकतर हिऱ्यांच्या स्वरूपात किंवा रोख पैशांच्या रूपात मायावती या देतात. ही रक्कम १५ कोटी रुपये असते, असे त्यांचे समर्थक सांगतात. मायावतींची ७२ घरे आहेत. ही गरिबी किंवा गरिबीबाबत बोलणाऱ्या मायावतींची माया आहे. बसपमध्ये कोणालाच मोफत उमेदवारी मिळत नाही. मायावतींनी १५ कोटींत तिकीट विकले असल्याचेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment