महेबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा उधळली मुक्ताफळे

mehbooba-mufti
श्रीनगर – पीडीपी नेत्या आणि जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावरून पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत. कलम 370 हटवल्यास काश्मीरचे पॅलेस्टाईन होईल. तसेच काश्मीरच्या भूमीवर कब्जा करणारा भारत हा केवळ देश बनून राहील, अशी टीका महेबूबा मुफ्ती यांनी केली आहे.

महेबूबा मुफ्ती या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना भाजपवर हल्ला करण्याची कोणतीही संधीत सोडताना दिसत नाहीत. श्रीनगरमधील प्रचारसभेत आज त्या म्हणाल्या की, अमित शहा महेबूबा मुफ्ती तुम्हाला सांगत आहे की, कलम 370 ज्या दिवशी संपुष्टात येईल. त्या दिवशी तुम्ही केवळ काश्मीरवर कब्जा करणारी शक्ती म्हणून शिल्लक राहाल. इस्राइलने सध्या ज्याप्रकारे पॅलेस्टाईनवर कब्जा केलेला आहे. त्याचप्रकारे जम्मू काश्मीरवरही भारताचा केवळ कब्जा शिल्लक राहील.

महेबूबा मुफ्ती यांनी यापूर्वी बुधवारीही कलम 370 हा प्रचाराचा मुद्दा बनवला होता. जम्मू काश्मीर कलम 370 रद्द झाल्यास भारताचा भाग राहणार नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या. जम्मू काश्मीर ज्या अटींवर भारताचा एक भाग बनले जर त्याच अटी काढून घेणार असाल तर आम्हाला जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करावे लागेल.

Leave a Comment