तुम्ही देखील या चिमुरड्याच्या निरागसपणाला कराल सलाम!

mizoram
मुले ही देवघरची फुले अशी आपल्याकडे मान्यता आहे. त्यांची निरागसता आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करतात. त्यांनी केलेल्या खोड्या आपल्यासाठी कृष्णलीला असतात. एकेकाळी आपण देखील लहान होतो आणि तोच निरागसपणा आपल्यात देखील होता. पण तोच निरागसपणा आपल्या वाढत्या वयोमानानुसार हरवत गेला. लहानमुले अनेकदा एखादी चुक केल्यानंतर निरागसपणे माफी देखील मागतात. असेच काहीसे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मिडियावर साठ हजारहून अधिक जणांनी मिझोरममधील एका लहान मुलाबद्दलची ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमधील माहितीनुसार येथील साईरंग भागातील हा चिमुकला सायकल चालवत असताना त्याच्या सायकलच्या चाकाखाली शेजारच्यांनी पाळेल्या कोंबडीचे एक पिल्लू आले. हा मुलगा या घडलेल्या प्रकारानंतर त्या कोंबडीच्या पिल्लाला हातात घेऊन धावतच जवळच्या रुग्णालयात गेला आणि तो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपल्याकडील सर्व पैसे देत या पिल्लाला ठिक करा असे सांगू लागला.

फेसबुकवर ही पोस्ट व्हायरल झाली असून त्याला झालेले दुख: या मुलाच्या हावभावांवरुन दिसून येत आहे. या मुलाच्या निरागसपणाचे अनेकांनी कौतुक केले आहे. अवघ्या काही तासांमध्ये पाच हजारहून अधिक जणांनी या पोस्टवर कमेन्ट करुन आपले मत नोंदवले आहे.

Leave a Comment