मादाम तुसाँदमध्ये बॉलीवूडच्या ‘डॅडी’चा पुतळा

karan-johar
सिंगापूरच्या मादाम तुसाँद संग्रहालयात बॉलीवूडचा डॅडी अशी ओळख असलेल्या निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण खुद्द करण जोहरच्या हस्ते करण्यात आले. जेव्हा करण या पुतळ्याजवळ उभा राहिला तेव्हा पुतळा कोण आणि खरा करण कोण हे क्षणभर लक्षात येत नव्हते एवढा हुबेहुब पुतळा साकारण्यात आला आहे. बॉलिवूडमधील करण जोहर हो पहिला दिग्दर्शक आहे ज्याचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात आला आहे.


करणचा हा पुतळा काळ्या रंगाचा कोट आणि सेल्फी घेतानाच्या पोजमध्ये आहे. करणची आई देखील पुतळ्याच्या अनावरणासाठी उपस्थित होती. पुतळ्यासोबतचा फोटो करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांना तुफान आवडला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.माझा मेणाचा पुतळा मादाम तुसाँद संहालग्रयात बनवण्यात यावा हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. तसेच या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहात होतो. हे संग्रहालय मी ८ वर्षांचा असताना पहायला आलो असल्याचे करण म्हणाला.

Leave a Comment