फेसबुकच्या कोट्यावधी युजर्सची माहिती अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक

facebook1
फेसबुकच्याच कर्मचाऱ्यांकडून युजर्सचे पासवर्ड लीक झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. आता अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर फेसबुकच्या कोट्यावधी युजर्सचा डेटा लीक झाला असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचे वृत्त सायबर स्पेस कंपनी अपगार्डने दिले आहे. अन्य दोन कंपन्या फेसबुकसाठी काम करीत आहेत, अ‍ॅमेझॉनच्या सर्व्हरवर त्यांनी युजरचा डेटा स्टोअर केला आहे. पण इतर कोणीही हा डेटा सहज प्राप्त करू शकते. एका कंपनीने यामध्ये 146 गीगाबाइट डेटा गोळा केला आहे. त्यात 540 मिनियन म्हणजेच 54 कोटी युजर्सच्या लाइक्स, कॉमेंट आणि अकाऊंटचा समावेश आहे.

फेसबुकच्या प्रवक्त्यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, असा कोठेही फेसबुकचा डेटा स्टोअर केला जाऊ शकत नाही. ही माहिती मिळाल्यावर तात्काळ अ‍ॅमेझॉनशी संपर्क साधून हा डेटा तिथून हटवला गेला आहे. दरम्यान इतर कंपन्यांना (थर्ड पार्टी) एखादे अ‍ॅप किंवा वेबसाइटवर आपल्या माध्यमातून साइन इन करण्याची परवानगी फेसबुक कंपनी देते. त्यामुळे युजर्सना डेटा सुरक्षित राहिलच याबाबत कोणतीही हमी फेसबुक देऊ शकत नाही.

फेसबुकच्या डेटा चोरी होत असल्याचा अनेक घटना गेल्या काही महिन्यांमध्ये उघडकीस आल्या आहेत. मार्क झुकेरबर्ग याने डेटा लीक प्रकरणी अध्यक्षपद सोडावे म्हणून वारंवार दबावही आणला गेला होता. त्यात इंस्टाग्रामवरील डेटाही लीक झाल्याचा प्रकार घडला होता. इंन्स्टाग्रामच्या ‘डेटा डाउनलोड टूल’मध्ये त्रुटी आढळल्याने युजरचा डेटा लीक झाला होता.

Leave a Comment