या महिन्यात तब्बल 10 दिवस बंद असणार बँका

bank
नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली असून बँकांना प्रत्येक एप्रिल महिन्यामध्ये मोठी सुट्टी असते. पण यावेळेस सलग मोठी सुट्टी नसून वेगेवेगळ्या दिवशी सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे आतापासूनच तुम्ही बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहून त्यानुसार आपली कामे करा. बँकांची सुट्टी राज्यांनुसार वेगवेगळ्या दिवशी राहणार आहे. एप्रिलमध्ये नेहमीप्रमाणे बैसाखी, राम नवमी, गुड फ्रायडे आणि महावीर जयंती, आंबेडकर जयंतीची बँकाना सुट्टी असणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका आधीच बंद असतात.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि गुजरातमधील बँका महिन्याच्या पहिल्या शनिवारी म्हणजेच 6 एप्रिलला गुढी पाडवा असल्याने बंद असतील. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नेहमीप्रमाणे बँका बंद राहतील. दुसरा शनिवार 13 आणि चौथा शनिवार 27 एप्रिलला येत आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये 20 एप्रिलला शनिवारी बँका उघड्या राहणार आहेत.

एप्रिल 13 आणि 14 एप्रिलला दुसऱ्या शनिवारी आणि रविवार असल्याने बँक बंद राहतील. या दोन्ही दिवशी आंबेडकर जयंती आणि बैसाखी देखील येत आहे. या दोन्ही सुट्ट्या शनिवार आणि रविवारी असल्याने बँकांची सुट्टी कमी होईल. 17 एप्रिल (बुधवारी) महावीर जयंती असल्या कारणाने अधिकतर राज्यांमध्ये बँकाना सुट्टी राहील. याच्या एक दिवसानंतर 19 एप्रिलला गुड फ्रायडे असल्यामुळे 19 एप्रिललाही बँक बंद राहतील.

Leave a Comment