कॉफी विथ करणमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर आपल्यासाठी सात महिन्यांचा काळ खुप अवघड असल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने म्हटले आहे. काल आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी अष्टपैलू कामगिरी करत हार्दिक पांड्याने संघाला विजय मिळवून दिला. कठीण काळात जे आपल्यासोबत उभे राहिले त्यांना हार्दिक पांड्याने आपल्या कामगिरीचे श्रेय दिलं आहे. चेन्नईविरोधात वानखेडे मैदानावर खेळताना फक्त आठ चेंडूत हार्दिक पांड्याने 25 धावा ठोकल्या आणि गोलंदाजी करत तीन विकेट्सही मिळवल्या हा सामना मुंबई इंडियन्सने 37 धावांनी जिंकला.
करणच्या कॉफी नंतरचे सात महिने माझ्यासाठी खुप अवघड होते – पांड्या
संघाला विजय मिळवून देण्यासाठी सतत मदत करणे आणि त्यात आपला खारीचा वाटा असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मला गेल्या सात महिन्यात फार कमी वेळा खेळण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी त्या सात महिन्यांचा कार्यकाळ फार अवघड होता. मला काय करायचे काहीच कळत नव्हते. फलंदाजी मी फक्त करत होतो. माझा खेळ मला अजून चांगला करायचा आहे. तुमच्या संघाला विजय मिळवून देण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावता हीच भावना जबरदस्त असल्याचे हार्दिक पांड्याने म्हटले आहे.