हलके तरीही चुस्ती देणारे आणि अनेक व्याधी दूर करणारे मखाने

lotus
शरीर चुस्त दुरुस्त असावे असे प्रत्येकाला वाटते. ते तसे राहावे म्हणून अनेक प्रकारचे व्यायाम, आणि आहारातील नियम अनेकजण पाळतात. कुणालाही सोसतील, सहज पचतील आणि तरीही शरीराला योग्य स्फूर्ती देऊन अनेक व्याधीपासून आराम देतील असा एक पदार्थ म्हणजे मखाने. मखाने हे कमळाचे बी असून त्यापासून बनविलेल्या लाह्या आहारात खूपच उपयुक्त आहेत. या मखाण्याचे नियमित आणि योग्य प्रकारे सेवन केले तर त्याचे अनेक फायदे मिळतात.

fox-seeds
ज्यांना मधुमेह आहे त्यांना मधुमेह कमी करण्यासाठी मखाने फार उपयोगी आहेत. रोज मखाने खाल्ले तर शरीरात इन्सुलिन निर्मितीचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे मधुमेह बरा होतो असे सांगतात. ज्यांना हृद्य दुखणे आहे त्यानाही मखाने उपयोगी पडतात. त्यांच्या नियमित सेवनाने हृदयाच्या अनेक गंभीर व्याधी बऱ्या होतात. ज्यांना स्ट्रेस येतो किंवा तणाव असतो त्यांनी मखाने नियमित खाल्ले तर तणाव दूर होतो. रात्रीच्या वेळी दुधाबरोबर मखाने खाल्ल्यास हाडे आणि सांधे दुखित आराम मिळतो कारण यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे.

मखाने पाचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. याच्या सेवनाने पचन सुधारते, जेवण सहज पचते तसेच जुलाब होत असतील तर ते थांबण्यासाठी मखाने उपयोगी आहेत. मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि मूत्रपिंडे चांगली कार्यरत राहण्यासाठी मखाने जरूर खावेत. यात फॅट अगदी कमी प्रमाणात आहे तसेच त्यातून कमी कॅलरी मिळतात. यामुळे कुठल्याची वेळी माखणे खाता येतात. मखाने खाल्ल्याने पोट लवकर भरते, भूक कमी होते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करून त्वचा जवान ठेवण्याचे काम मखाने करतात.

makhana
गरोदर महिलांनी अशक्तपणा वाटत असेल तर मखाणे खाल्ले तर शरीराला ताकद मिळते. मखाने थोड्याश्या साजूक तुपावर परतून खाल्ले जातात, नुसते खाल्ले जातात, खीर करून खाता येतात किंवा रसभाजी बनवूनही खाता येतात. मखाने हे कमळाचे बीज असून ते पाण्याखाली येते. भारताप्रमाणे कोरिया, जपान, रशिया येथेही हे बीज गोर्गावं नावाने आहारात वापरले जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment