देवदेवतांवरून पडली या शहरांची नावे

mysore
भारत हा देवदेवतांचा देश आहे. हिंदू धर्मीय लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ३३ कोटी देवांचा हा देश आहे. त्यामुळे देशभर अनेक देव देवतांची मंदिरे असून राम, कृष्ण, शंकर, हनुमान, देवी, दुर्गा, पार्वती अश्या विविध देवदेवतांची पूजा येथे केली जाते. इतकेच नव्हे तर भारतातील अनेक शहरांची नावे देवावरून पडली आहेत.

mumbai
श्रीमंत देवस्थान म्हणून जगात मान्यता पावलेले केरळच्या तिरुवनंतपुरम या शहरातील पद्मनाभ मंदिर अनेकांनी पहिले असेल. या मंदिरातील मुख्य देव अनंत म्हणजे विष्णू. त्याच्या नावावरून या शहराचे नाव पडले आहे. चंडीगड हे नाव देवी चंडी वरून पडले असून त्याचा अर्थ चंडीमातेचा गड ते चंडीगड. जबलपूर हे मध्यप्रदेशातील शहर. त्याचे नाव रामायणातील जाबाली ऋषी वरून पडले आहे. जबल म्हणजे पर्वत असाही एक अर्थ आहे. मैसूर हे कर्नाटकातील मोठे शहर. त्याचे नाव महिष नावाच्या राक्षसावरून पडले असून या महिषासुराचा वध दुर्गेने केला म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असे म्हटले जाते.

jalandhar
मंगलोर या गावाचे नाव मंगल देवीवरून पडले आहे तर महाराष्ट्राची मुंबई मुंबादेवी मुळे मुंबई आहे. शिमला या हिमाचल प्रदेशच्या राजधानीचे नाव कालिका देवी किंवा शामला देवी वरून शिमला असे पडले आहे तर कानपूर हे मुळचे कान्हापूर असल्याचे सांगतात. या गावाविषयी दोन प्रवाद आहेत. एकानुसार महाभारतातील कर्णावरून ते कानपूर आहे तर दुसरा समज असा कि कृष्णाचे आणखी एक नाव कान्हा. त्यावरून ते कानपूर आहे.

shimla
हरिद्वार हे शहर चार धाम यात्रेचे प्रवेशद्वार. याचा अर्थ हरी का द्वार. म्हणजे भगवानापाशी पोहोचण्याचा रस्ता. पंजाबातील जलंदर शहराला हे नाव एका राक्षसावरून पडले असे म्हणतात. हे शहर रामाचा मुलगा लव याचे राजधानीचे शहर होते असेही सांगितले जाते. इंदोर चे नाव येथील इंद्रेश्वर मंदिरावरून आले असून येथे इंद्रदेवाचा निवास असतो असा समज आहे. अंबाला आंबा देवीवरून तर नैनिताल हे नाव नैनादेवी वरून पडले आहे. दंतेश्वरी देवीवरून दंतेवाडा हे नाव आले आहे.

Leave a Comment