बालाकोटमध्ये ३०० अतिरेकी मारले गेले- निवृत्त एअर मार्शल वर्थमान

varthaman
माजी निवृत्त एअरमार्शल आणि पाकचे एफ १६ विमान मिग २१ विमानांतून पाडून चर्चेत आलेले विंग कमांडर अभिनंदन यांचे वडील सिम्हाकुट्टी वर्थमान यांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २५० ते ३०० अतिरेकी मारले गेले असे विधान केले आहे. बुधवारी आयआयटी मद्रासच्या डिफेन्स स्टडीज विभागातील विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. यावेळी त्यांनी हा हल्ला कसा झाला याची माहिती दिली आणि २५० ते ३०० अतिरेकी ठार झाल्याचा किंवा हल्ला कसा केला गेला असावा या संबंधातला त्यांचा समज कदाचित चुकीचा असू शकतो असेही सांगितले.

balakot
वर्थमान म्हणाले, पुलवाम हल्ल्यानंतर भारत काहीतरी ठोस कृती करणार याची पाकिस्तानला खात्री होती आणि ते पूर्ण सावध होते. पाकिस्तानची एफ १६ विमाने भारतासाठी धोकादायक आहेत त्यामुळे हि विमाने हल्ला करतेवेळी दूर राहतील किंवा दुसऱ्या भागात राहतील याची काळजी घेतली गेली होती. भारताने या बाबत पाकिस्तानची दिशाभूल करताना सात विमाने बहावलपुरच्या दिशेने पाठविली कारण ही जागा जैश ए मोहम्मदचे मुख्यालय असलेली आहे. त्यामुळे भारत येथे हल्ला करेल असा पाकिस्तानचा समज झाला आणि त्यांनी त्यांची एफ १६ विमाने या भागात पाठविली त्याचवेळी भारतातून गेलेल्या मिराज विमानांनी बालाकोटवर बॉम्बफेक केली. दुसरे म्हणजे पाकिस्तानी सीमा ओलांडून भारतीय विमाने हल्ला करतील अशी कल्पना पाकिस्तानला आली नाही.

बालाकोट येथे केल्या गेलेल्या बॉम्बफेकीवेळी तेथील शिबिरात मोठ्या संख्येने जैशचे अतिरेकी होते. तेथे कदाचित इमारतीचे नुकसान फारसे झालेले नसेल पण बॉम्ब उशिराने फुटल्याने मोठ्या संखेने दहशतवादी ठार झाले. माझा समज कदाचित चुकीचा असू शकेल अशी पुस्ती यावेळी वर्थमान यांनी जोडली.

सत्ताधारी भाजपने या हल्ल्यात २५० ते ३०० अतिरेकी ठार झाल्याचे सांगितले आहे मात्र विरोधी पक्षाने त्यांचे पुरावे मागितले आहेत.

Leave a Comment