आता नुसते बोलून करा ऑनलाईन शॉपिंग

walmart
इ कॉमर्स कंपनी अमेझोन ला टक्कर देण्यासाठी अमेरिकन जायंट वॉलमार्टने गुगल बरोबर भागीदारी करून व्हॉइस असिस्टंट शॉपिंग प्रोग्राम आखला आहे. यामुळे ग्राहक आता नुसते बोलून घरबसल्या हवी ती खरेदी करू शकणार आहेत. अँड्राईड आणि आयफोन युजर या सेवेचा लाभ घेऊन शकतील. घरबसल्या तुम्हाला हवे असेल त्या सामानाची यादी तुम्ही बोलून दिली कि थोड्याच वेळात तुमच्या यादीनुसार सामान घरपोच मिळेल असे वॉलमार्टने जाहीर केले आहे. एप्रिलच्या मध्यापासून ही सेवा ग्राहकांना मिळणार आहे.

वॉलमार्टचे सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट टॉम वॉर्ड म्हणाले, गुगल होम सर्विसेस सह ही सेवा कंपनी देणार आहे. व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने ग्राहकाच्या सामानाच्या गरजा स्पष्ट होतील आणि मागच्या ऑर्डरच्या मदतीने माहिती घेतली जाईल. ग्राहक जेवढा या सेवेचा वापर करेल तेवढी त्याच्या सामानाच्या गरजेची अधिक माहिती मिळेल आणि त्याला दिल्या जाणाऱ्या सुविधा सुधारतील. म्हणजे ग्राहकाने दुध ऑर्डर केले तर कोणत्या प्रकारचे दुध त्याच्याकडे वापरले जाते याची सिस्टीम रेकोर्ड होईल. त्यानंतर पुढच्या वेळी ऑर्डर देताना त्याला दुधाचा प्रकार सांगावा लागणार नाही तर फक्त दुध इतकेच म्हणावे लागेल. सध्या हि सेवा गुगलच्या मदतीने दिली जाणार असली तरी भविष्यात अन्य प्लॅटफॉर्मवर ती उपलब्ध केली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment