या अभिनेत्रीने प्रभुदेवाशी लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म

prabhu-deva
आज दाक्षिणात्य सुपरस्टार आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभुदेवाचा 46 वा वाढदिवस आहे. त्याला आपल्या देशाचा मायकल जॅक्सन म्हणून ओळखले जाते. लहानपणापासूनच प्रभुदेवाला नाचण्याची आवड होती. त्याचे वडिलही दक्षिणेतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. तो सध्या ‘दबंग ३’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला इंदौरमध्ये सुरुवात झाली असून पण आज आम्ही तुम्हाला प्रभुदेवाच्या चित्रपटांबद्दल आणि नाचाबद्दल नाही तर त्याच्या लव्ह लाईफबद्दल सांगणार आहोत. प्रभुदेवाची ती प्रेम कहाणी जी कधीच पूर्ण होऊ शकली नाही.
prabhu-deva1
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री नयनतारा हिची सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये गणती केली जाते. अनेक चित्रपट फक्त तिच्या नावावरच सुपरहिट होतात. एकेकाळी वर्तमानपत्रांचे रकाने नयनतारा आणि प्रभुदेवा यांच्या लव्हस्टोरीने भरायचे.अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेटही केल्यानंतर प्रभुला नयनताराने लग्नाबद्दल विचारले. प्रभुदेवाचे लग्न न करण्याचं ठोस कारण होते. प्रभुदेवाशी लग्न करण्यासाठी नयनताराने धर्मही बदलला होता. पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रभुदेवा आधीच विवाहित होता.
prabhu-deva2
१९९५ मध्ये प्रभुदेवाने लग्न केले होते. पहिले लग्न झालेले असतानाही त्याला नयनताराशी लग्न करायचे होते. पण त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. दोघांच्या अफेअरबद्दल प्रभुदेवाच्या पत्नीला कळले. यावर तिने न्यायालयात जाण्याची धमकी दिली. तसेच अन्न त्याग करण्याचीही धमकी दिली. प्रभुदेवाच्या पत्नीच्या या धमकीनंतर नयनतारा आणि त्याने माघार घ्यायची ठरवली. त्यामुळे दोघांचे लग्न करून एकत्र राहण्याचे स्वप्न कायमस्वरूपी भंगले.

Leave a Comment