मागच्या महिन्याच्या 31 तारखेला ब्रिटनमध्ये मदर्स डे साजरा करण्यात आला होता. लंडनच्या काही इमारतींवर याच दिवशी Inflatables Boobs लावण्यात आले. हे शहरातील जास्तीत जास्त ठिकाणांवर लावण्यात आले. ते ठिकठिकाणी लावण्या मागचे कारण स्तनपानाबाबत जागृती करण्याचे होते. एक सर्व्हे गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आला होता, ज्यात महिलांकडून सार्वजनिक ठिकाणांवर स्तनपान करण्याला जगभरात चुकीचे मानले जाते. पण ही चुकीची धारणा मोडण्यासाठी आता या मोहिमेच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले आहे.
एक हॅशटॅग तानिया बोलरने सुरू केला असून तानिया बोलर एका कंपनीमध्ये सीईओ आहे. ही मोहिम तिनेच सुरू केली आहे. तिने ही मोहिम #FreetheFeed हा हॅशटॅग वापरून सुरू केली. सोशल मीडियात यावर अनेक पोस्ट शेअर होऊ लागल्या. ही मोहिम लोकांना जागरूक करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. स्तनपानादरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
स्तनपान करताना लोक अनेकदा महिलांसोबत गैरवर्तणूक करतात. त्यामुळे या मोहिमेचा उद्देश आहे की, लोकांनी स्तनपानाला वेगळ्या दृष्टीने बघू नये. कधीही सार्वजनिक ठिकाणांवर महिला त्यांच्या बाळांना स्तनपान करवू शकतात. या मोहिमेचे अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे.