मेहबूबा मुफ्ती बरळल्या,….. तर भारतापासून काश्मिर वेगळा करु

mehbooba-mufti
श्रीनगर – पुन्हा एकदा नव्या वादाला जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी खतपाणी घातले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जर भाजपने कलम 370 रद्द केले तर जम्मू काश्मिरला भारतापासून वेगळा करु, अशा बरळल्या आहेत.

जम्मू काश्मिर ज्या अटींवर भारताचा एक भाग बनला जर त्याच अटी काढून घेणार असाल तर आम्हाला जम्मू काश्मिरला भारतापासून वेगळे करावे लागेल. 2020 पर्यंत जम्मू काश्मिरमधील कलम 370 आणि अनुच्छेद 35 ए रद्द करण्याची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केल्यानंतर मुफ्ती यांनी हे वक्तव्य केले आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही मेहबूबा मुफ्ती यांनी भाष्य केले. काश्मिर घाटीतील सैन्यांची उपलब्धता काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये त्यांचे सरकार आल्यास कमी केली जाईल तसेच AFSPA वर पुर्नविचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे काँग्रेसने जाहीरनाम्यात मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सांगितलेल्या गोष्टीच नमूद केल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले. जम्मू-काश्मिरचा वेगळा पंतप्रधान असावा, अशी मागणी कालच ओमर अब्दुल्ला यांनीही केली होती. तसेच जम्मू-काश्मिरच्या संरक्षणासाठी वेगळा पंतप्रधान त्या राज्याला मिळायलाच हवा, याचाही उल्लेख ओमर अब्दुल्लांनी केला होता.

Leave a Comment