अमेरिकेकडून भारताला मिळणार अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स

america
नवी दिल्ली – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला २.४ अब्ज डॉलर किमतीचे २४ बहुपयोगी एमएच ६० रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टरची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. मागील एक दशकाहून अधिक काळापासून इन हंटर हेलिकॉप्टरची भारताला गरज होती. पाणबुडी आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास लॉकहिड मार्टिनद्वारे निर्मित हेलिकॉप्टर सक्षम आहेत. जगातील सर्वांत अत्याधुनिक समुद्री हेलिकॉप्टर या हेलिकॉप्टरची गणना केली जात असल्यामुळे भारतीय नौसेनेची मारक क्षमता वाढणार आहे.

मंगळवारी २४ एमएच ६० आर बहुपयोगी हेलिकॉप्टरच्या विक्रीस ट्रम्प प्रशासनाने मंजुरी दिली. भारतीय संरक्षण दल या हेलिकॉप्टरमुळे आणखी मजबूत होणार आहे. आपल्या अधिसूचनेत अमेरिकेने म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक संबंध प्रस्ताविक विक्रीमुळे आणखी मजबूत होतील. त्याचबरोबर अमेरिकेची विदेश नीती आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होण्यास मदत मिळेल.

अंदाजे किंमत ही २.४ अब्ज डॉलर एवढी या हेलिकॉप्टरची असेल. यामुळे भारताला क्षेत्रीय संकटांना सामोरे जाण्यास मदत मिळेल आणि त्यांची गृह सुरक्षाही मजबूत होईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. खंडातील सैन्य संतुलन हेलिकॉप्टर विक्रीमुळे बिघडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तज्ज्ञांच्या मते चीनचे हिंद महासागरात होणारे आक्रमक धोरण पाहता भारतासाठी एमएच ६० रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर आवश्यक होते.

Leave a Comment