लीक झाले ‘दबंग 3’मधील गाणे

salman-khan
दबंग सिरीजमधील तिसरा भाग लवकरच तुमच्या भेटीला येणार असून अभिनेता सलमान खान सध्या त्याच चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे सध्या मध्यप्रदेशमध्ये चित्रिकरण सुरु असुन येथे चित्रपटाच्या शीर्षक गीताचे चित्रिकरण सर्वात आधी करण्यात येत आहे. पण या चित्रिकरणाचा एक व्हिडीओ लीक झाला असून त्यात सलमान खान डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सर्वात मोठ्या सेटवर या चित्रपटातील गाणे हे शूट करण्यात येणार होते आणि गाणे 500 बॅकअप डान्सर घेऊन तयार करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. सलमान खानही या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहे.


सलमानसोबत खूप बॅकग्राऊंड डान्सर व्हिडीओमध्ये दिसत आहेत. तसेच साधूही पाण्यात दिसत आहेत. नुकतेच ट्वीट करत सलमाननेही मध्य प्रदेशच्या मंडलेश्वर येथे शूट सुरु असल्याची माहिती दिली होती. सलमान खानचे आजोबा मंडलेश्वर येथे पोलीसमध्ये होते. सलमान चित्रपटातही पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 डिसेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment