कडूनिंबाप्रमाणे त्याच्या निंबोळ्याही आरोग्यासाठी फायदेशीर

neem
नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढ्या उभारल्या जातात तेव्हा त्यात कडूनिंबाच्या झाडाची पाने आवर्जून बांधली जातात. कडूनिंब हा अतिऔषधी आणि कुठल्याही ठिकाणी येणारा, कमी पाण्यात जगणारा एक महत्वाचा वृक्ष आहे. भारतात प्राचीन काळापासून या झाडाची पाने, फळे औषधात वापरली जात आहे. कडूनिंबाला येणारी फळे म्हणजे निंबोळ्या. त्याही कडूनिंबाच्या पानाप्रमाणे औषधी आहेत.

seeds
कडक उन्हात कडूनिंबाच्या सावलीत आसरा घेतला तर उन्हाचा त्रास कमी होतो याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. निंबोळ्या मध्येही अनेक औषधी गुण असून त्वचा, केस यांच्या आरोग्यासाठी त्या फायदेशीर आहेत. पिकलेल्या निंबोळ्या खाता येतात. मात्र त्या प्रमाणात खाल्या गेल्या पाहिजेत. पाने आणि निंबोळ्या यांच्यापासून चहा बनवून तो घेतला तर आरोग्यासाठी अतिशय हितकर ठरतो. मात्र हा चहा कडू लागतो. असा चहा मूत्रपिंडे आणि प्रोस्ट्रेट ग्रंथीच्या विकारात उपयुक्त ठरतो. केसाच्या तसेच त्वचेच्या समस्या सुटण्यासाठी पाने आणि निंबोळ्या उपयोगी असून त्यामुळे केस गळणे, कोंडा, त्वचेवरील मुरमे कमी होतात. त्वचा नितळ बनते, त्वचा रोग बरे होतात. निंबोळ्या अँटी पॅरासिक, अँटी बॅक्टेरीयल, अँटी फंगल गुणांनी युक्त असून त्यामुळे इन्फेक्शन दूर होतात. त्यातील प्रोटीन, व्हीटॅमीन सी, कॅरोटीन आरोग्यासाठी उपयुक्त असते. निंबोळ्या वाटल्या तर त्याचा उग्र वास येतो यामुळे डास दूर पळतात आणि मलेरिया सारख्या रोगांपासून बचाव होतो.

निंबोळ्याचे तेल काढले जाते. या तेलाचा वापर डासांची अंडी घालण्याची क्षमता कमी करण्यासाठी होतो. या तेलातही अँटी एजिंग, अँटी ऑक्सीडंट आहेत. त्यामुळे चेहरा तजेलदार होतो, सुरकुत्या कमी होतात. दाताच्या स्वच्छतेसाठी आणि दात मजबूत होण्यासाठी निंबोळ्या तेल वापरता येते. यामुळे हिरड्याची सूज कमी होते तसेच दातातील कीड मारते. प्राचीन काळापासून निंबोळ्याचा उपयोग अँटीसेप्टिक म्हणून केला जात आहे. निंबोळ्याचे तेल बाजारात मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment