जपानमध्ये बनला जगातील महागडा बर्गर

burger
गोल्डन जायंट बर्गर हे नाव ऐकून तुम्हाला हा बर्गर आकाराने मोठा असणार याचा अंदाज आलाच असेल. पण खरी गोष्ट अशी कि तो केवळ आकारानेच नाही तर जगातील सर्वात महाग बर्गर ठरला आहे. या बर्गर मध्ये सोन्याचा वापर केला गेला असून हे सोने पोटात गेले तरी कोणताही अपाय होणार नाही. मुख्य म्हणजे हा बर्गर जपान मध्ये प्रिन्स नारुहितो हा नवा सम्राट म्हणून कार्यभार स्वीकारत असून त्याच्या सन्मानार्थ हा बर्गर बनविला गेला आहे. प्रिन्स नारुहातो १ मे रोजी सम्राट बनेल आणि त्याबरोबर जपान मध्ये नवे युग सुरु होईल. हे युग रेवा नावाने सुरु होत आहे.

burger11
हा बर्गर बनविणारा शेफ आहे पॅट्रिक शिनाडा. हा बर्गर टोक्योच्या ग्रांड हयात हॉटेल मधील अॅकडोर स्टिक हाउस रेस्टॉरंट मध्ये बनविला गेला आहे. तो आता सर्वसामान्य लोकही मागवू शकतील फक्त त्यासाठी त्यांना ७०० युरो म्हणजे १ लाख येन म्हणजे ६३ हजार रुपये मोजावे लागतील. त्यासोबत वाईनची बाटली मोफत दिली जाणार आहे. हा बर्गर बनविताना ब्रेड मध्ये सोन्याचे फ्लेक्स घातले गेले आहेत आणि वाग्यु मीट, फोई ग्रास अश्या महागड्या पदार्थांचा वापर केला गेला आहे. हा बर्गर फुटबॉल एवढ्या आकाराचा असून त्याचे वजन ३ किलो आहे. हा एक बर्गर ५ ते ६ जणांना पोटभर होणार आहे.

शेफ सांगतो हा अमेरिकन स्टाईल बर्गर बनविताना मी जपानशी जुडलेली माझी मुळे सांधली असून तो जपानी रेसिपी प्रमाणे बनविला आहे. या निमित्ताने एक नवा दौर जपान मध्ये सुरु होतो आहे याचा आनंद आहे.

Leave a Comment