कॅमेरॅॅन, वेदनाप्रुफ महिला

cameron
सध्या बॉलीवूड मध्ये मर्द को दर्द नही होता या नावाचा एक चित्रपट गाजतो आहे. त्याच धर्तीवर या औरतको भी दर्द नही होता असे म्हणता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे चित्रपटातील हिरोला प्रत्यक्षात वेदना होत असतीलही पण या महिलेला मात्र खरेच कोणत्याची वेदना होत नाहीत. कॅमेरॅन ही ७१ वर्षाची स्कॉटलंडची रहिवासी महिला ही अनोखी देणगी घेऊन आयुष्य मजेत जगते आहे. स्कॉटलंडच्या इन्व्हर्नेस शहराची ती रहिवासी आहे.

द गार्डियनने दिलेल्या बातमीनुसार कॅमेरॅनवर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत पण तिला एकदाही त्याची वेदना जाणवलेली नाही. हात कापला, भाजला तरी वेदना नाहीच. तिने मुलांना जन्म दिला तेव्हाही प्रसूती वेदना तिला भोगाव्या लागल्या नाहीत. हात भाजला तर हाताचे मास जळल्याचा वास येतो पण जळजळ होत नाही. त्यामुळे तिला वेदनाशामक गोळी घेण्याची वेळ येत नाही. हे सर्व तिच्याबाबत घडतेय ते तिच्या जनुकात झालेल्या काही बदलांमुळे असे जेम्स कॉक्स याने तिच्यावर केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.

dard
वयाच्या ६५ व्या वर्षी तिचे हिप रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले. तिच्या हिपची अवस्था पाहून डॉक्टर हैराण झाले पण कॅमेरॅनला तिथे कोणतीही वेदना होत नव्हती. तरी प्रीकॉशन म्हणून डॉक्टरनी तिला ऑपरेशन झाल्यावर दोन वेदनाशामक गोळ्या दिल्या असे समजते.

जेम्स कॉक्स यांनी कॅमेरॅनच्या जनुकांवर संशोधन केले तेव्हा त्यांना तिच्या जनुकात दोन बदल झाल्याचे दिसले. त्यामुळे तिला वेदना आणि काळजी जाणवत नाही आणि तिची हॅपीनेस लेव्हल वाढली आहे. तिला कोणताही तणाव येत नाही कारण तिची मेंटल लेव्हल अगदी मजबूत आहे. जेम्स यांच्या म्हणण्यानुसार कॅमेरॅन सारखी आणखीही काही लोक आहेत. ज्यांना सतत वेदना भोगाव्या लागतात त्यांना अशी जीन थेरपी देऊन किंवा जनुक बदल घडवून आणून त्यांना आणि भविष्यात सर्वच लोकांना वेदना मुक्त करता येऊ शकेल काय याचा विचार केला जात आहे. अर्थात त्यासाठी हे जनुक कसे काम करते ते अगोदर शोधावे लागणार आहे आणि त्यानंतरचा दर्द मुक्त जीवन माणसाला मिळवून देता येणार आहे.

Leave a Comment