एमजी मोटर्सची हेक्टर ठरणार भारतातील पहिली इंटरनेट कार

hector
एमजी मोटर्सने भारतात प्रथमच प्रवेश करताना ऑटो क्षेत्रातील स्पर्धा वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. कंपनीने त्यांची पहिली एसयुव्ही हेक्टर शोकेस केली असून ही भविष्यातील कार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. अर्थात यासाठी अनेक कंपन्यांचे सहकार्य घेतले गेले असून त्यांच्या सहकार्याने बनलेली आयस्मार्ट नेक्स्ट जनरेशन हेक्टर भारतातील खऱ्या अर्थाने पहिली इंटरनेट कार बनणार आहे. या कारमध्ये अशी अनेक फीचर्स आहेत जी अद्यापि अन्य कारमध्ये उपलब्ध नाहीत.

एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष राजीव चाबा या संदर्भात बोलताना म्हणाले, आम्ही अनइंटरप्लेड ड्रायविंग अनुभव देण्याचा वादा केला आहे आणि त्यासाठी कारमध्ये इंटरनेट सह अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यात एक एम्बेडेड सीम कार्ड ओटीए सह दिले गेले आहे. भारतात सध्या फोर जी नेटवर्क असले तरी लवकरच ५ जीची सुरवात होणार हे लक्षात घेऊन त्या कनेक्शनसह ही कार ग्राहकाला मिळणार आहे.

या कारचे सर्वात उत्तम फिचर म्हणजे व्हॉइस असिस्टंट हे फिचर. हे उच्च क्षमतेचे उपकरण क्लाऊड व हेड युनिटवर काम करते. एआय व मशीन लर्निंग अल्गोरिदम मध्ये डेव्हलपमेंट केलेले हे तंत्रज्ञान खूपच उपयुक्त आहे. याच्या सहाय्याने खिडक्या उघडणे, सन रूफ उघडणे, बंद करणे, एसी कंट्रोल, नेव्हिगेशन सारख्या १०० कमांड देता येतात. सिग्नल विक असेल तरी हे नेटवर्क काम करते. हेक्टर या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत लाँच केली जाईल आणि तिची भारतात किंमत १२ ते १८ लाख रुपयादरम्यान असेल.

या कारमध्ये आयस्मार्ट नेक्स्ट जनरेशन स्क्रीन असून त्याचे डिझाईन व्हर्टिकल इंटरफेस सह आहे. केवळ टच करून किंवा व्हॉइसच्या सहाय्याने ते वापरता येईल. ही कार पूर्णपणे बटणफ्री आहे. तिची फीचर्स अॅक्टीव्हेट करताना किंवा कार सुरु करताना फक्त हॅलो एमजी इतकेच बोलावे लागेल.

Leave a Comment