लवकरच ‘83’ या चित्रपटात ‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सवरील वेबसीरिजमधून प्रसिद्ध झालेला बंटी उर्फ जतीन सरना झळकणार असून अल्पावधीतच ‘सेक्रेड गेम्स’ मध्ये बंटी हा खलनायक साकारणाऱ्या जनीतने लोकप्रियता मिळवली होती. ‘83’ या चित्रपटात क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत तो दिसणार आहे.
‘83’मध्ये हा अभिनेता साकारणार यशपाल शर्मा
#SacredGames actor Jatin Sarna to essay the role of #YashpalSharma in #83TheFilm… Stars Ranveer Singh as #KapilDev… Directed by Kabir Khan… Presented by Reliance Entertainment… Produced by Madhu Mantena, Vishnu Induri, Kabir Khan… #CastOf83 #Relive83 pic.twitter.com/NE150lZmHW
— taran adarsh (@taran_adarsh) April 2, 2019
या भूमिकेविषयी जतीनने आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या नावाची चित्रपटासाठी घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खानसोबत घडलेला किस्साही सांगितला. जतीनच्या चित्रपटसृष्टीत काम मिळण्याच्याही आधीचा तो काळ होता. मित्रांसोबत मी रिक्षाने जात होतो. दिग्दर्शक कबीर खान यांची समोरून गाडी येत होती. त्यांना मी हात दाखवला, मला त्यांनीही प्रतिसाद दिला. मलाही एवढ्या मोठ्या माणसाने हात दाखवला हे पाहून माझे मित्रही अवाक् झाले. कबीर खानला तू ओळखतो का, असे मला मित्रांनी विचारले अर्थात ते मला ओळखत नव्हते. पण मी भविष्यात या व्यक्तीसोबत नक्की काम करेन आणि ते मला ओळखू लागतील असे मी त्यांना सांगितले होते आणि एवढ्या वर्षांनंतर ती गोष्ट खरी झाली असल्याचे जतीन म्हणाला.