ही अभिनेत्री झाली गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड

mayuri-kango
मयुरी कांगो हे नाव तुमच्या परिचयाचे आहे का, नाही ना! पण याच मयुरीने 1996 साली प्रदर्शित झालेल्या पापा कहते हैं या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्या चित्रपटातील घर से निकलते ही, कुछ दूर चलतेही, रस्ते मैं है उसका घर हे गीत आजही अनेकांच्या आवडीचे गाणे आहे. अभिनेत्री मयुरी कांगो या गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झाली होती. मयुरीच्या या चित्रपटातील लुकमुळे लाखो तरुण घायाळ झाले होते.

पहिल्या चित्रपटापासूनच मयुरीला लोकप्रियता मिळाली होती. पण तिचे त्यानंतरचे चित्रपट काही खास करु शकले नाही. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मयुरी कांगो मॅनेजिंग डायरेक्टर होती. मयुरीने नुकताच गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. मयुरी तातडीने तिच्या पदाचा कार्यभाग स्वीकारणार आहे. afaqs.com या वेबसाइटकडे या बातमीला स्वतः मयुरीने दुजोरा दिला आहे.

मयुरीने तिच्या करिअरची सुरुवात न्यूयॉर्क येथील ३६० आय या डिजीटल एजन्सीमधून केली. ती मीडिया मॅनेजर म्हणून या कंपनीत काम करत होती. तसेच मयुरीने डिजीटास कंपनीत मीडिया विभागाची असोसिएट डिरेक्टर मीडिया काम पाहिले आहे. ९० च्या दशकातल्या ही सुंदर अभिनेत्री अनेक वर्ष बॉलिवूडपासून दूर राहिली. ‘पापा कहते है’ आणि ‘होगी प्यार की जीत’ या दोन चित्रपटांशिवाय तिचा एकही चित्रपट फारसा चालला नाही. २००० मध्ये आलेल्या वामसी या तेलगु चित्रपटात ती दिली. मोठ्या पडद्यावर यश मिळत नाही म्हटल्यावर तिने आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला. ‘नरगिस’ (२०००), ‘थोड़ा गम, थोड़ी खुशी’ (२००१), ‘डॉलर बाबू’ (२००१) आणि ‘किट्टी पार्टी’ (२००२) या मालिकांमध्ये काम केलं. मात्र इथेही तिच्या पदरी निराशाच पडली.

Leave a Comment