या कपंनीच्या सीईओ 10 वर्षांपासून धुतली नाही जीन्स

Jeans
वॉशिंग्टन – आपल्याकडे नेहमीच धुतलेले कपडे घालायची पद्धत आहे. पण तुम्हाला कोणी जर असे विचारले की तुमची जीन्स पँट कधी धुतली आहे, गेल्या आठवड्यात कि गेल्या महिन्यात? त्याला तुम्ही कालच धुतली आहे असे उत्तर नक्कीच द्याल.

पण क्लॉथिंग कंपनीचे सीईओ चिप बर्ग हे याला अपवाद आहेत, कारण त्यांनी गेल्या दहा वर्षांत आपण जीन्सच्या पँट्स धुतल्याच नसल्याचा अजब दावा केला आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: ६१ वर्षीय चिप यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी जीन्सच्या स्वच्छतेसाठी अनेक गोष्टींची माहिती दिली. चिप म्हणाले, ड्रायक्लिनिंगसाठी माझी जीन्स पँट कधी गेलेली नाही. ओरिजनल डेनिमचे तुम्ही चाहते असाल तर तुम्हाला जीन्स पँटच्या जोड ठेवण्याची गरज नसल्यामुळे कपड्याला सुरकुत्या पडत नाहीत अथवा कलर फिका होत नाही. यामुळे मी हजारो लिटर पाणी वाचवले आहे.

Leave a Comment