‘माव्‍‌र्हल’च्या आगामी सिरीजमध्ये झळकू शकते देसी गर्ल

priyanka-chopra
भारतात मार्व्हलच्या चित्रपटांचा मोठा चाहता वर्ग असून भारतीय चाहतेही ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण एकही भारतीय सुपरहिरो या सुपरहिरोंच्या यादीत नाही. पण बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राची आता ‘माव्‍‌र्हल’च्या आगामी चित्रपटात वर्णी लागू शकते.

भारतात येत्या २६ एप्रिलला ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ प्रदर्शित होत असून मुंबईतून या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात होणार झाली आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’चे सहाय्यक दिग्दर्शक असलेले ज्यो रुसो मार्व्हल स्टुडिओ आगामी चित्रपटासाठी प्रियंकाच्या नावाचा विचार करत असल्याचे यावेळी म्हणाले आहेत. भारतीय कलाकारांसोबत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान काम करायला आवडेल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना प्रियंका चोप्राच्या कामाचे कौतुक केले.

प्रियंका चोप्रासोबत काम करायला मला आवडेल. आमचे एका प्रोजेक्टसाठी तिच्यासोबत बोलणे सुरूच आहे. हा प्रोजेक्ट काय असणार आहे हे मी तुम्हाला आताच सांगणार नसल्याचे रुसो म्हणाले. भारतीय बाजारपेठ मार्व्हलसाठी खूपच मोठी असून येथील प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेमही दिले असल्याचे म्हणत रुसो यांनी कौतुक केले आहे.

Leave a Comment