16 व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या जीमेलचे युजर्सना खास गिफ्ट

gmail
नवी दिल्ली – 1 एप्रिल 2019 म्हणजेच काल ईमेलच्या दुनियेत लोकप्रिय असणाऱ्या जीमेलला 15 वर्ष पूर्ण झाली असून जीमेल ही सेवा ग्राहकांना जगातील इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलकडून पुरवली जाते. 1 एप्रिल 2004 रोजी जीमेल हे अ‍ॅप्लीकेशन गुगलच्या पॉल बुकेट याने लाँच केले होते. जीमेलसोबत अनेक फीचर्सदेखील देण्यात आले होते. जीमेलच्या ग्राहकांना 15 जीबीपर्यंत फ्री स्टोरेज डेटा सुविधा देण्यात आली होती. जगभरात सध्याच्या घडीला 150 करोडपेक्षा अधिक जीमेलचे युजर्स आहेत. 50 एमबीपर्यंतच्या फाईल्स जीमेलमध्ये जोडल्या जाऊ शकतात. सामान्य युजर्ससाठी गुगलकडून देण्यात आलेली ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. तर काही कंपन्यांकडून ही सेवा पेड स्वरुपात घेतली आहे.

गुगलने 16 व्या वर्षात पदार्पण करताना जीमेल युजर्ससाठी काही खास फीचर्स आणले आहेत. जीमेलला युजर्ससाठी आणखी अपडेट करण्यात आले आहे. न्यू जीमेल असेही त्याला बोलू शकता. गुगलने या न्यू जीमेलला आणखी नवीन फीचर जोडले आहेत. त्याचसोबत आर्टिफिशियल इंटेलिजेंससारखे नवीन टूल्सचा समावेशही केला आहे.

गुगलने जीमेल युजर्ससाठी नवीन स्मार्ट कंपोज फिचर आणले असल्यामुळे युजर्सकडून पाठवण्यात येणाऱ्या ईमेलला गती मिळणार आहे. युजर्सला गूगलचे हे फिचर एखादे वाक्य पूर्ण करण्यासाठी मदत करणार करणार आहे. तसेच तुम्ही ऑफलाईन फीचरने इंटरनेट नसतानाही ईमेल पाठवू शकता अशी सुविधा देण्यात आली आहे. तर Nudge फीचरमधून गुगलद्वारे युजर्स रिमाईंडर देण्यात येईल की तुम्ही कोणता ईमेल वाचला नाही अथवा कोणत्या ईमेलला रिप्लाय केला नाही.

तसेच आणखी एक फीचर देण्यात आले आहे ज्यामध्ये एखाद्याला ईमेल पाठवण्याची वेळ तुम्हाला ठरवता येणार आहे. उदा. समजा, तुम्ही एखादा ईमेल ड्राफ्ट केला तो मेल तुम्हाला आता लगेच नाही तर दुसऱ्या दिवशी अथवा काही तासानंतर पाठवायचा असेल तर त्यासाठी जीमेलमध्ये शेड्युल्ड फीचर जोडण्यात आल्यामुळे ठराविक दिवशी तुम्हाला एक ईमेल पाठवायचा आहे, तो लक्षात ठेवण्याची गरज नाही. मेल टाइप करुन तुम्ही शेड्युल्ड करा त्यानंतर गुगल ऑटो-जनरेट सिस्टीमने तुमचा ईमेल शेड्युल्ड केलेल्या वेळेला पाठवून देईल.

Leave a Comment