दुबईत बनलेला शमुख ठरला जगातला महागडा परफ्युम

perfume
जगातला महागडा परफ्युम बनविला गेल्याचा दावा अमिरातीने केला असून या परफ्युमचे नाव शमुख असे ठेवले गेले आहे. या अरबी शब्दाचा अर्थ सर्वात योग्य असा आहे. या परफ्युमची तीन लिटरच्या बाटलीची किंमत १२९५००० डॉलर्स म्हणजे ८ कोटी ९३ लाख रुपये आहे. अमिरातीच्या नोबिल परफ्युम ग्रुपने सतत तीन वर्षे संशोधन करून आणि ४९४ विविध परफ्युम टेस्ट करून हा तयार केला आहे. गिनीज बुक मध्ये या परफ्युमच्या बाटलीने दोन विक्रम नोंदविले आहेत. या परफ्युमसाठी विशेष प्रकारची इटालियन मुरानो क्रिस्टलची बाटली तयार केली गेली आहे.

shumukh
या अतिशय किमती बाटलीवर सोन्याचा ससाणा, अरबी घोडे, गुलाब, एक ग्लोब बसविले गेले आहेत. त्यासाठी ३८.५५ कॅरेटचे हिरे, १८ कॅरेट गोल्डचा अडीच किलो वजनाचा विशाल मोती, ५.९ किलो चांदी याचा वापर केला गेला आहे. आजपर्यंत सर्वात महाग परफ्युमचे गिनीज रेकॉर्ड क्लाइव्ह क्रिस्तियन नंबर वन इम्पिरिअल मॅजेस्टी याच्या नावावर होते. २००५ मध्ये बनविलेला हा परफ्युमच्या ५०० मिलीच्या दहा बाटल्याची किंमत ८९ लाख रुपये होती. नोबिल ग्रुपचे प्रमुख असगर आदम अली यांनी हा जगातील महागडा बनलेला परफ्युम कुणी खरेदी केला त्याची माहिती दिलेली नाही मात्र पब्लिक डिस्प्ले साठी ही बाटली दुबई मॉल मध्ये ३० मार्च पर्यंत ठेवली गेली होती.

अर्थात जगातील महागडा परफ्युम अशी ख्याती मिळविलेल्या या परफ्युमचा दावा फार काळ टिकणारा नाही कारण मोरीयाल पॅरीस वर्किंग परफ्युमने त्यांचा १० लिटर बाटली कव्हरसाठी सोने, हिरे माणके जडविली असल्याचे जाहीर केले आहे. या परफ्युमची किंमत १८ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १ मिली परफ्युम साठी १८०० डॉलर्स असेल असे सांगितले आहे.

Leave a Comment