कचरा जमा करण्यासठी या देशातील लोक झालेत क्रेझी

nedher
जगभरात सध्या कचरा हा मोठा प्रॉब्लेम असताना जगाच्या पाठीवर एक देश असाही आहे जेथील नागरिक कचरा जमविण्यासाठी क्रेझी बनले आहेत. त्यामुळे बहुसंख्य जनतेसाठी समस्या असलेला कचरा या देशातील नागरिकांना वरदान वाटतो आहे.

वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन हा आज जगासाठी मोठा चर्चेचा विषय बनला असताना नेदरलंड सरकारने मात्र नुसती चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करायला सुरवात केली आहे आणि त्यात देशातील नागरिक योगदान देत आहेत. विशेषतः अॅमस्टरडॅम आणि रॉटरडॅम या दोन शहरात घराघरातील महिला कचरा गोळा करून त्याची साठवण करत आहेत आणि घरातील सर्व वेस्ट मटेरियल द झिरो वेस्ट लॅब मध्ये नेऊन देत आहेत. त्याबदली त्यांना डिस्काऊंट कुपन दिली जात आहेत.

netherland
देशभरात कचरा रिसायकल करण्यासाठी मोहीम सुरु असून जागोजागी वेगवेगळ्या प्रकारच्या कचर्यासाठी पेट्या बसविल्या गेल्या आहेत. वाया जाणारे अन्न, घरातील मोडके फर्निचर वा तत्सम सामान, प्लास्टिक वस्तू, मुलांची मोडकी खेळणी, घरातील जुने कपडे, टॉवेल, बूट, मोडक्या किंवा जुन्या इलेक्ट्रोनिक वस्तू, संपलेल्या बॅटऱ्या, ट्रे, कप या प्रकारचे काचेचे सामान असे सर्व जुने सामान घेण्यासाठी सेकंडहँड माल विकत घेणारी दुकाने सुरु केली गेली आहेत. असे सामान आणून देणाऱ्यांना काही मोबदला दिला जातो. याचा अर्थ असा कि देश कचरा मुक्त ठेवण्यासाठी नेदरलंड सरकारने भंगार माल विकत घेणारी दुकाने सुरु केली आहेत. या दुकानांना परवाने दिले गेले आहेत.

या वाया जाणाऱ्या वस्तूंचा उपयोग अनेक प्रकारे केला जात आहे. काहीतून कलाकृती निर्माण करून त्यापासून देशाचे सौंदर्य वाढविले जात आहे. जुने कपडे बॅग्ज, कुशन कव्हर बनविण्यास्ठी वापरले जात आहेत इलेक्ट्रिक सामान, मोडकी खेळणी, प्लास्टिक बाटल्या वर्कशॉप मध्ये पाठवून रिसायकल केल्या जातात आणि पुन्हा वापरत आणल्या जात आहेत. परिणामी ही शहरे कचरामुक्त आणि म्हणून प्रदूषण मुक्त झाली आहेत.

Leave a Comment