शाओमीचा स्मार्ट राईस कुकर लाँच

rice
चीनी कंपनी शाओमीने स्मार्टफोन, टीव्ही, स्मार्ट स्पोर्ट्स शूज नंतर आता स्मार्ट राइस कुकर चीन मध्ये लाँच केला असून त्याचा टीझर नुकताच रिलीज केला गेला आहे. शाओमीचे व्हाइस प्रेसिडेंट आणि शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनुकुमार जैन यांनी ट्विटरवर हे टीझर रिलीज केला आहे.

कंपनीने दोन स्मार्ट कुकर सादर केले असून त्यातील एक राईस तर दुसरा इंडक्शन कुकर आहे. हे नवे कुकर कंपनीच्या इको सिस्टीम लाईनअपचा भाग आहेत. भारतात अजून तरी ते उपलब्ध झालेले नसले तरी आंतरराष्ट्रीय वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहेत. हे कुकर मिझिया राईस आणि मिझिया इंड अश्या नावाने सध्या चीनी बाजारात विक्रीसाठी आले आहेत.

पैकी मिझीया राईस कुकरसाठी ५९९ युआन म्हणजे ६१०० रुपये मोजावे लागणार आहेत तर मिझिया इंड साठी १९९ युआन म्हणजे २ हजार रुपये द्यावे लागतील. या कुकर मध्ये ओलेड डिस्प्ले दिला गेला असून हे कुकर कॉरस्पॉडिंग अॅपशी कनेक्ट करता येतील. त्यामुळे कुकरमधील प्रेशर, तापमान नियंत्रित करता येणार आहे. चीन मध्ये मिझिया इंडक्शन दोन व्हरायटी मध्ये मिळत असून त्यातील बेस व्हेरीयंट २९९ युआन तर लाईट व्हेरीयंट १९९ युआन मध्ये मिळणार आहे.

कुकरसोबत अॅक्सेसरिज दिल्या जातील मात्र त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार आहेत. या कुकरमध्ये शिजविलेला भात अधिक चवदार बनत असल्याचा दावा केला जात आहे. इंडक्शन बेस्ड अन्य राईस कुकर मध्ये भात २० मिनिटात शिजतो या कुकर मध्ये त्यासाठी ४० मिनिटे लागतात. त्यामुळे भाताची चव, पोत यात खूपच फरक पडतो असे कंपनीचे म्हणणे आहे. यात ३ हजार प्रकारचे भात तयार करता येतात आणि प्रत्येकासाठी वेगळा प्रोग्राम दिला गेला आहे असेही सांगितले जात आहे. भाताशिवाय यात खीर, केक बनविता येतील असे समजते.

Leave a Comment