किळसवाण्या पालीविषयी बरेच काही

lizard
उन्हाळ्याची सुरवात झाली कि घराघरातून पाली फिरू लागतात. पाल हा अतिशय किळसवाणा सरपटणारा प्राणी असून घरातील दिवे. ट्यूब भोवती पाली हमखास दिसतात. अर्थात रात्रीच्यावेळी लाईट भोवती जमणारे छोटे किडे कीटक हे त्यांचे भक्ष्य असते व त्यासाठी पाली दिव्याभोवती जास्त प्रमाणात दिसतात. पालीला इंग्लिश मध्ये लिझार्ड म्हटले जाते आणि ऐकून नवल वाटेल पण जगात ५६०० विविध जातीच्या पाली आहेत.

पालीला जेव्हा धोक्याची जाणीव होते तेव्हा शेपटी वेगळी करण्याची अनोखी देणगी तिच्या कामी येते. पाल मारण्याचा प्रयत्न करून पहा, प्रथम ती शेपटी वेगळी करते. हे शेपूट वळवळत राहिल्याने पालीकडचे लक्ष आपोआप कमी होते आणि तेवढा वेळ पालीला तिची सुटका करून घेण्यास पुरेसा होतो. विशेष म्हणजे ही तुटलेली शेपटी काही दिवसात पुन्हा येते.

konodo
काही पाली लांबीला अधिक असतात आणि त्यांना सापासारखे अगदी छोटे पाय असतात त्यामुळे अनेकदा त्यांना साप समजून मारले जाते. पण अश्यावेळी नीट पहिले तर पाल असेल तर तिला कान आहेत हे दिसते. पालीला गंधज्ञान असते पण ते जीभेमार्गे होते यामुळे पाल वारंवार जीभ आत बाहेर करताना दिसते. बहुतेक पाली विषारी नसतात मात्र काही पाली खूपच विषारी असतात. त्याच्या शरीरावर सुद्धा विष असते.

कोनोडो ड्रॅॅगन नावाची पाल जगातील सर्वात मोठी पाल आहे. ती १० फुट लांबीची असते. पालीचे दात सतत पडतात आणि नवीन येतात. जंगली पाली शत्रूला घाबरविण्यासाठी डोळ्यातून रक्ताची चिळकांडी उडवितात. जेथे पाणी कमी असते तेथे पाली त्यांच्या शरीरात पाणी साठवितात. पाल या प्राण्याचे अस्तित्व पृथ्वीवर २०० दशलक्ष वर्षे जुने आहे असे वैज्ञानिक सांगतात. अंटार्टीका सोडून जगभरात सर्वत्र पाली आहेत. पालीच्या काही जाती सरड्याप्रमाणे वातावरणानुसार त्यांचा रंग बदलू शकतात.

Leave a Comment