सर्वाधिक कमाई करण्याऱ्या चित्रपटांच्या यादीत शाहरुखचा एकही चित्रपट नाही

shahrukh-khan
बी-टाऊनमध्ये ज्याची रोमान्सचा अशी ओळख असलेल्या शाहरुख खानला हिंदी सिनेसृष्टीत 26 वर्षे झाली असून या कालावधीत त्याने एकापेक्षा एक अशा विविध चित्रपटात दमदार अभिनय साकारला आहे. पण सध्याच्या घडीला बॉलीवूड असलेली त्याची जादू ओसरली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामागे कारण देखील तसेच आहे. बॉक्स ऑफीसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत शाहरुखच्या एकाही चित्रपटाचा समावेश नाही. शाहरुखच्या चित्रपटांना आमिर-सलमानच्या चित्रपटांना मिळणार प्रतिसाद मिळत नसल्याचे एका यादीतून स्पष्ट झाले आहे.


या बाबतची माहिती देणारी यादी चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या यादीनुसार पहिल्या क्रमांकावर एस.एस.राजामौली यांचा ‘बाहुबली २’ आहे. तर आमिरचा ‘दंगल’ दुसऱ्या स्थानावर, रणबीर कपूरचा ‘संजू’ तिसऱ्या स्थानावर आणि पुन्हा एकदा चौथ्या स्थानावर आमिरचा ‘पीके’ हा चित्रपट आहे. या यादीत सलमान खानचे ‘टायगर जिंदा है’ ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ हे तीन चित्रपट अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. सातव्या स्थानी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा ‘पद्मावत’ आहे. तर विकी कौशलच्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ने बाजी मारत दहावे स्थान पटकावले आहे.

बॉक्स ऑफीसवर शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू इअर’ या दोन चित्रपटांनी २०० कोटींचा आकडा पार केला होता. पण त्याच्या चित्रपटांना त्यानंतर काही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. ‘दिलवाले’, ‘फॅन’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘झिरो’ या चित्रपटांची कमाई जेमतेम झाली.

Leave a Comment