प्रियंका-निकच्या काडीमोडाच्या नुसत्या वावड्या

priyanka-chopra
अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने लग्नगाठ बांधल्यानंतर सोशल मीडियात त्यांची जोरदार चर्चा झाली. त्यांच्या लग्नाला आता काही महिनेच लोटले असताना ते विभक्त होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाल्या होत्या. पण आता या वावड्यांवर स्वतः प्रियंकाने पूर्णविराम लावला आहे. याकरिता तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पहिल्यांदाच आपण जोनास ब्रदर्सच्या कार्यक्रमात हजेरी लावली असल्याचे म्हटले आहे.


जोनास ब्रदर्स बरोबरचा फोटो आपल्या पोस्टमध्ये तिने शेअर केला आहे. तिने याबाबत लिहिताना म्हटले आहे, माझा पहिला जोनास ब्रगर्स शो, हे खूप अविश्वसनीय आहे, मला या सर्वांचा अभिमान आहे.

एका मासिकातून प्रियंकाच्या घटस्फोटाच्या या वृत्ताची सुरूवात झाली आहे. निक आणि प्रियंकामध्ये काही अलबेल नसल्याचे वृत्त अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या एका मासिकामध्ये पहिल्यांदा छापून आले. या मासिकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, सध्या लहान-लहान गोष्टींवरून प्रियंका आणि निकमध्ये वाद होत असतात आणि एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. निक प्रियंकाच्या लग्नाला 4 महिने पूर्ण होत असतानाच या मासिकात छापून आलेल्या बातमीने त्यांच्या घटस्फोटाची अफवा पसरली आहे.

Leave a Comment