निवडणूक आयोगाने असा शोधून काढला देशातील पहिला मतदार

voter
आता अवघ्या दिवसांवरच लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार मतदारांच्या पायघड्या घालत आहे. पण आज आम्ही तुम्हाला निवडणूक आयोगाने या दरम्यान देशातील पहिल्या मतदाराला कसे शोधून काढले याबाबतची माहिती देणार आहोत.
voter1
1951साली स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक पार पडली होती. यावेळी हिमाचल प्रदेशात पहिल्यांदा मतदान घेतले गेले. लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील किन्नोर येथे श्यामसरन नेगी यांनी पहिल्यांदा मतदान केले होते. आता श्यामसरन यांचे 102 वर्ष एवढे वय आहे. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत त्यांनी मतदान केले आहे. सर्वात आधी मतदान प्रक्रिया किन्नोर मतदारसंघातील वातावरणामुळे पूर्ण केली जाते. श्यामसरन हे पहिले मतदार असल्याची माहिती मात्र वेगळ्याच पद्धतीने समोर आली.
voter2
2007 साली किन्नोरमध्ये हिमाचल प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा नंदा या उपायुक्त होत्या. त्यांची श्यामसरन नेगी यांच्याशी तेव्हा भेट झाली होती. नेगी यांनी त्यावेळी आपण भारतातील पहिले मतदार असल्याचे सांगितले होते.
voter3
याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला नंदा यांनी कळवली. त्यानंतर मुख्यालयातील कागदपत्रे तपासल्यानंतर नेगी हेच पहिले मतदार असल्याचे पुढे आले. तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी श्यामसरन नेगी यांचा सत्कार केला होता. श्यामसरन यांच्या निवासस्थानी हा सत्कार करण्यात आला होता. गुगलने नेगी यांचा मतदान जनजागृतीसाठी एक व्हिडीओ देखील तयार केला होता. हिमाचलमध्ये 1 हजार पेक्षा जास्त मतदारांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. 1917 मध्ये श्यामसरन नेगी यांचा जन्म झाला आहे.

Leave a Comment