‘या’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये अक्षय कुमारसह स्क्रिन शेअर करणार हे कलाकार

trio
भयपटाला विनोदी तडका देऊन दिग्दर्शक अमर कौशिकने स्त्री या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केली होती. बॉलिवूडमध्ये २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या चित्रपटानंतर कोणताही विनोदी भयपट प्रदर्शित झाला नाही. आता लवकरच तुमच्या भेटीला आणखी एक विनोदी भयपट येणार आहे. तो चित्रपट आहे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांचा दक्षिणात्य चित्रपट कंचना या चित्रपटाचा हिंदी रिमेक.

अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारसह या रिमेकमध्ये अभिनेता आर माधवन आणि कियारा अडवाणी देखील दिसणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटाची कथा कियाराला फार आवडली आहे. तसेच या चित्रपटात काम करण्यास आर माधवनने होकार दिला असल्याचे समोर आले आहे.

या महिन्यात ‘कंचना’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच या रिमेकचे दिग्दर्शन खुद्द राघव लॉरेन्स करणार की बॉलिवूड दिग्दर्शक करणार हे अद्याप समोर आले नाही. ‘कंचना’ हा दाक्षिणात्य विनोदी भयपट असून या आधी या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले असून ‘कंचना ३’ हा पुढील भाग १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स केले असून चित्रपटात राघव लॉरेन्स, अभिनेत्री ओव्हिया आणि वेधिका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a Comment